‘एनएमएमएस’परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल

‘एनएमएमएस’परीक्षेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल
Published on

‘एनएमएमएस’मध्ये जिल्हा राज्यात अव्वल

शिष्यवृत्तीसाठी १७०३ विद्यार्थी पात्र; दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये मिळणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः केंद्र शासनाने राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी (सन २०२४-२५) कोल्हापूर जिल्ह्यातून २७ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ७०३ विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ताधारक ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची एकूण शिष्यवृत्तीची रक्कम ८ कोटी १७ लाख ४४ हजार रुपये होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून लोकसहभागातून घेतली जाणारी सराव चाचणी, मार्गदर्शन आणि शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे १७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे, दिगंबर मोरे, अजय पाटील, विस्तार अधिकारी धनाजी पाटील, जयश्री जाधव, डॉ. विश्वास सुतार, डी. सी. कुंभार, रत्नप्रभा दबडे यांनी मुख्याध्यापक सहविचार सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
...........
चौकट
दोन्ही शिष्यवृत्तींची रक्कम ५४ कोटी
सारथी शिष्यवृत्तीसाठी सुमारे १२ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी ९ हजार ६०० रुपये दरवर्षी याप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याची एकूण रक्कम ४६ कोटी ८ लाख रुपये होते. एनएमएमएस आणि सारथी शिष्यवृत्ती मिळून एकत्रितपणे ५४ कोटी २३ लक्ष ४४ रुपये रकमेची शिष्यवृत्ती कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
.........
कोट....
शिक्षकांच्या मार्गदर्शनातील सातत्य, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच माध्यमिक शिक्षण विभागाने घेतलेली सराव चाचणी यामुळे एनएमएमएस परीक्षेत यश मिळाले आहे. कोल्हापूरची यशस्वी परंपरा शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, संस्थाचालक, कर्मचारी आदी सर्व घटकांनी जतन केल्याचा मनस्वी आनंद होत आहे.
- डॉ. एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com