

59870
परवेज गैबान
यांची निवड
इचलकरंजी : परवेज गैबान यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेश सचिवपदी निवड केली. निवडीचे पत्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दिले. गैबान यांनी सामाजिक कार्यकतून पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. सूरज चव्हाण, विठ्ठल चोपडे, लतीफ गैबान आदी उपस्थित होते.
--------------
कायाकल्प पथकाची
‘आयजीएम’ला भेट
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयास राज्याच्या कायाकल्प पथकाने भेट देऊन येथील सोयी-सुविधांची पाहणी केली. बाह्यरुग्ण विभागातील स्त्रीरोग विभागाची पाहणी करून तेथील व्यवस्थापन, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, डायलेसिस विभाग तसेच रुग्णालयातील कार्यरत अन्य विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत पथकाने समाधान व्यक्त केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. डॉ. सना अमरीन, डॉ. संध्या बोईर, डॉ. प्रियांका साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. प्रकाश मोरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.