विद्यापीठातील प्रियंका पवार हिची जर्मनीतील ‘हॅनोवर’मध्ये निवड

विद्यापीठातील प्रियंका पवार हिची जर्मनीतील ‘हॅनोवर’मध्ये निवड
Published on

प्रियांका पवार हिची
जर्मनीतील
‘हॅनोवर’मध्ये निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थिनी प्रियांका उल्हास पवार हिची जर्मनी येथील होशुल हॅनोवर युनिव्‍हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स अँड आर्टस् येथे २० जूनपर्यंत चालणाऱ्या इंटरनॅशनल समर स्कूल प्रोग्राम फॉर क्लिनिकल रिसर्चसाठी निवड झाली. विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागांतर्गत सुरू असलेल्या वैद्यकीय माहिती व्यवस्थापन या विषयामध्ये एम. एस्सी. द्वितीय वर्षात प्रियांका शिकत आहे. तिला इंटरनॅशनल समर स्कूल प्रोग्राममध्ये क्लिनिकल रिसर्च क्षेत्रातील प्रशिक्षण आणि त्यामधील आंतरराष्ट्रीय स्थरावरील विविध संधीचे प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी जर्मनीमधील प्रोफेसर कॉर्नेलिया फ्रॉम्के व इतर तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वैद्यकीय माहिती व्यवस्थापन हा अभ्यासक्रम जीवरसायनशास्त्र अधिविभागात सुरू असून, त्यासाठी सर्व सायन्स, मेडिकल व फार्मसी विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, असे अधिविभागप्रमुख डॉ.पद्मा दांडगे यांनी सांगितले. या निवडीबद्दल प्रियंका हिचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, समन्वयक डॉ. कैलास सोनवणे, नवनाथ कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com