संत तुकाराम महाराज समितीतर्फे निवेदन

संत तुकाराम महाराज समितीतर्फे निवेदन
Published on

जीवबा नाना पार्क - नंदवाळ
रस्ता दुरुस्ती, नामकरणाची मागणी
कोल्हापूर, ता. २४ : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज भक्ती मार्ग विकास नागरिक समितीतर्फे जीवबा नाना पार्क ते नंदवाळ रस्ता दुरुस्त करून त्यास जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी भाविकांनी केली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राधानगरी रोडवर वाशीपासून नंदवाळकडे जाण्यासाठी रस्ता आहे. अलीकडे नंदवाळ हे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध पावत आहे. नंदवाळमध्ये पोलिस खात्याचे एसआरपी प्रशिक्षण केंद्र तयार झाले आहे. त्यांच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळेही वाहतुकीवर ताण पडतो. वाशी नंदवाळ रस्त्याशिवाय नंदवाळवरून कोल्हापूरला जायला कच्चा रस्ता आहे. तो जिवबा नाना पार्क येथे मिळतो. जिवबा नाना पार्क ते नंदवाळ असा रस्ता पक्का झाला तर वाहतुकीवरील ताण कमी होईल. जिवबानाना कॉलनीपासून एक किलोमीटरचा रस्ता पक्का डांबरी झालेला आहे. त्यापुढील दीड किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. त्यावर भर टाकून वाहने जाण्यासाठी योग्य केल्यास वाहतूक त्या बाजूने वळवता येईल. कोल्हापूर-नंदवाळ अंतर एक किलोमीटरने कमी होईल. उर्वरित रस्त्यावर भर घालून तो वाहतूकयोग्य करावा; तसेच कोल्हापूरमध्ये संत तुकारामांच्या नावे रस्ता किंवा चौक नाही, तेव्हा या नियोजित रस्त्याचे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी आहे.
यावेळी चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, आनंदराव चौगुले, अमर जाधव, वैशाली जंगम, विकास जंगम, संजय चौगुले, सुहास साळुंखे, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय निकम, चंद्रकांत बागडी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com