

तरुणाचा आकस्मिक मृत्यू
कोल्हापूर, ता. २३ ः येथील एका लॉजवर एका २३ वर्षांच्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. गुरुवारी मध्यरात्री संबंधित तरुण लॉजवर गेला. त्याचा मित्र रस्त्यावर थांबून त्याची वाट पाहत होता. मात्र, मित्र बेशुद्ध पडल्याचे त्याला समजले. त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.