टुडे २

टुडे २
Published on

66002
चंदगड ः एसटी आगारात दाखल झालेल्या नवीन पाच लालपरींच्या उद्‌घाटन प्रसंगी आमदार शिवाजी पाटील. शेजारी मंगेश चिवटे, आगार व्यवस्थापक सतीश पाटील व इतर.
---------------------------
चंदगड आगाराकडे पुरेशा बसेस उपलब्ध करू
आमदार शिवाजी पाटील : नवीन पाच लालपरींचे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः चंदगड तालुका दुर्गम आहे. भौगोलिक विस्तारही मोठा आहे. सर्वसामान्य माणसाला दळणवळणासाठी एसटी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आगाराकडे पुरेशा बसेस उपलब्ध केल्या जातील, असे आश्वासन आमदार शिवाजी पाटील यांनी दिले. आगाराकडे दाखल झालेल्या नवीन पाच लालपरींचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘वरिष्ठ पातळीवर पुरेशा बस उपलब्ध कराव्या, अशी मागणी केली आहे. त्यापैकी पाच गाड्या मिळाल्या आहेत. उर्वरित गाड्याही लवकरच आगारात दाखल होतील.’ येथील आगाराने कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गडहिंग्लजच्या पुढचे थांबे कमी करून त्यांचा वेळ वाचवावा, अशी सूचनाही त्यांनी केली. आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुक्याचा विस्तार मोठा आहे. विविध मार्गांवर गाड्यांची मागणीही आहे. मात्र कोरोना महामारीनंतर कमी झालेल्या बसेस पुन्हा उपलब्ध न झाल्यामुळे मार्गावर वाहतूक करण्यात अडचणी आहेत. जसजशा नवीन गाड्या उपलब्ध होतील तसतसे सर्व मार्ग पुन्हा चालू केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगश चिवटे, रवींद्र बांदिवडेकर, रघुवीर शेलार, जयवंत सुतार, सचिन बल्लाळ, श्रीशैल नागराळ, सहायक वाहतूक अधीक्षक विशाल शेळके, सहायक वाहतूक निरीक्षक ए. डी. मुल्ला, संदेश सावंत यांच्यासह आगारातील कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. कपिल मुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com