गिरणी कामगारांचा मोर्चा

गिरणी कामगारांचा मोर्चा
Published on

मंत्री आबिटकरांच्या कार्यालयावर
गिरणी कामगारांचा आज मोर्चा
कोल्हापूर ः गिरणी कामगारांना मुंबईच घरी मिळाली पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी रविवार (ता.२५) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर गिरणी कामगारांचा मोर्चा निघणार आहे. गारगोटी येथील बसस्थानक चौकातून सकाळी ११ वाजाता मोर्चा निघेल, असी माहिती श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिली. काही बिल्डर्स, एजंट, मंत्र्यांना भेटून गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घरे द्या, अशी मागणी करीत गोंधळ निर्माण करीत आहेत. पालकमंत्र्यांना गिरणी कामगारांची सत्य बाजू समजण्यासाठी जास्ती जास्त संख्येने गिरणी कामगारांनी मोर्चात सहभागी होणे गरजेचे आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांनी गारगोटीत होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. गिरणी कामगारांना पनवेल येथे घरांची जागा दाखविण्यासाठी काहीनी एजंटानी बसद्वारे सहल काढत आहेत, असे प्रकार थांबवले जावेत, असा इशारा ही श्रमिक संघातर्फे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com