पंचगंगेच्या पाणी पातळीत सहा इंचांनी वाढ; पाच बंधारे पाण्याखाली

पंचगंगेच्या पाणी पातळीत सहा इंचांनी वाढ; पाच बंधारे पाण्याखाली
Published on

वारणा पात्राबाहेर
पंचगंगेच्या पातळीत अर्धा फुटाने वाढ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : गेले तीन दिवस दमदार हजेरी लावणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने आज उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात सहा इंचांनी वाढ झाली. राधानगरी, वारणा, दूधगंगेसह प्रमुख धरणांमध्ये पाणी पातळीत किंचित वाढ झाली. दरम्यान, या पावसाने वारणा नदी प्रथमच मेमध्ये पात्राबाहेर पडली आहे.
राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी रात्री १७ फूट सहा इंचांवर होती. या बंधाऱ्यावर दुसऱ्या दिवशीही पाणी असल्याने येथील वाहतूक ठप्पच होती. दरम्यान, जिल्ह्यातील रुई, इचलकरंजी, यवलूज, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले.
जिल्ह्यात पावसाची उघडीप राहिली तरी दिवसभरात अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे सर्वत्र पाणीच पाणी केले. शेतांमध्ये पाण्याची तळी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्पच आहेत. काढणीला आलेली पीक शेतातच असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसाने पेरणीचा यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. धरण क्षेत्रातील पावसाने राधानगरी, दूधगंगा, वारणा, पाटगाव, कुंभी, कासारी, तुळशी यासह प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली. नदी क्षेत्रात पडलेल्या पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठला १७ फूट होती. रात्रीपर्यंत पातळीत सहा इंचांनी वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी २६.६ तर धरण क्षेत्रात ४० मिलिमीटर पाऊस झाला.

पाऊस मिलिमीटरमध्ये
*हातकणंगले*२३.९
*शिरोळ*६.४
*पन्हाळा*५१.६
*शाहूवाडी*६१.५
*राधानगरी*३५.४
*गगनबावडा*७९.३
*करवीर*३२.२
*कागल*११.२
*गडहिंग्लज*४.०
*भुदरगड*१४.३
*आजरा*८.०
*चंदगड*१९.५

धरण क्षेत्रात
*राधानगरी*८८
*तुळशी*१०९
*वारणा*५८
*दूधगंगा*३६
*कासारी*६२
*कडवी*४३
*कुंभी*६१
*पाटगाव*९५
*चिकोत्रा*१५
*चित्री*१७
*जंगमहट्टी*२३
*घटप्रभा*६०
*जांबरे*६५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com