

67332
आजरा ः कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स वेलफेअर असोसिएशनच्या सभेत बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूसकर. या वेळी उपस्थित पदाधिकारी.
काजू उद्योगाच्या
अडचणी सोडविण्यावर भर
कोंडुसकर ः आजऱ्यात ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स’ची सभा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३१ ः तालुक्यात सुमारे साडेतीनशे उद्योजक काजू प्रक्रिया व्यवसायात आहेत. या उद्योजकांच्या अडी अडचणी, समस्या तसेच शासकीय पातळीवरील प्रश्न सोडवण्याचे काम या असोसिएशनमार्फत केले जात असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कोंडूसकर यांनी सांगितले.
आजरा औद्योगिक वसाहतीजवळील खोराटे रेस्टॉरंटच्या सभागृहात कॅश्यू मॅन्युफॅक्चर वेलफेअर असोसिएशनची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी काजू व्यवसायातील समस्यांवर चर्चा व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन झाले.
श्री. कोंडूसकर म्हणाले, असोसिएशनचे १६३ सभासद आहेत. असोसिएशनमार्फत ४५ उद्योजकांना २.५ टक्के जीएसटी परतावा मिळण्यासाठी सहकार्य केले. उद्योजकांनी व्यवहार जीएसटी बिलानुसारच करावेत. यामुळे कायदेशीर कारवाई करणे सोयीचे होईल व फसवणूक होणार नाही.
आनंद भेसडिया यांनी परदेशी काजू बी, तयार माल खरेदी-विक्री व आयात-निर्यातीबाबत मार्गदर्शन केले. क्रायकार्ड कंपनीचे रिजनल मॅनेजर मानस पॉल यांनी स्टॅबिलायझरचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. सचिव परेश पोतदार यांनी वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन केले. संचालक मंडळास असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेणे व पोटनियम दुरुस्तीचे अधिकार देण्याची मान्यता सभेत घेतली. पांडुरंग जोशीलकर, अमोल मुरुकटे, दशरथ बोलके, भूषण नांदवडेकर, उत्तम सलामवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विकास फळणेकर, संदीप पवार, निशांत जोशी, दयानंद देवलकर, विश्वास जाधव, सुरेश चौगले, भास्कर निकम, उद्योजक महादेव पोवार, बाबूराव मांजरेकर आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.