टुडे १०२

टुडे १०२
Published on

67365
गडहिंग्लज : शहरातील वाहतुकीच्या प्रश्नाबाबत हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली. याप्रसंगी एकनाथ काळबांडे, किरण कदम, रामदास इंगवले, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील आदी उपस्थित होते.

गडहिंग्लजमधील वाहतुकीला शिस्त लावा
हसन मुश्रीफ : पोलिस व पालिका प्रशासनाला दिले आदेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : शहरातील वाहतुकीबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचला, असे आदेश आज वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिस आणि पालिका प्रशासनाला दिले. महिनाभराने पुन्हा बैठक घेऊन आढावा घेणार आहे. परिस्थितीत सुधारणा दिसली पाहिजे, असा दमही त्यांनी भरला. येथील शासकीय विश्रामगृहावर शहरातील प्रश्नासंदर्भात ही बैठक झाली.
पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी शहरातील वाहतुकीच्या प्रश्नाची माहिती दिली. श्री. मुश्रीफ यांनी मुख्य मार्गावर सम-विषम पार्किंग का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. वाहनांची संख्या अधिक असल्याने ते शक्य नसल्याचे श्री. इंगवले यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेने चार कर्मचारी नेमावेत. त्यांनी दंडात्मक कारवाईसाठी पोलिसांची मदत घ्यावी. वाहतुकीला अडथळा करणारी जुनी वाहने जप्त करावीत. पालिका व पोलिस प्रशासनाने आपले अधिकार वापरावेत. त्यांच्या कारवाईवर पोलिस उपअधीक्षकांनी देखरेख ठेवावी, असे आदेश श्री. मुश्रीफ यांनी दिले.
संकेश्वर-बांदा महामार्गामुळे शहरात निर्माण झालेल्या प्रश्नांची माहिती मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी दिली. श्री. मुश्रीफ यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. चार ठिकाणी ई-टॉयलेट उभारण्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी नगरोत्थानमधून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वस्त केले. शहराची पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्याधिकारी ढेकळे यांना दिले.
प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, सिद्धार्थ बन्ने, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, बाळासाहेब घुगरी आदी उपस्थित होते.
----
प्रशासकीय इमारतीबाबत
उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक...
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘आजरा रोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या जागेची प्रशासकीय इमारतीसाठी मागणी केली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबतची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com