गड- मनवाड सोसायटी

गड- मनवाड सोसायटी
Published on

67464
गडहिंग्लज ः मनवाड सोसायटीवर प्रशासक नियुक्ती मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने सहायक निबंधक अमित गराडे यांना दिले.


मनवाड सोसायटीवर
प्रशासक नियुक्त करा
गडहिंग्लज, ता. १ ः तालुक्यातील मनवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांनी २४ लाखांची रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली असली तरी अद्याप त्यांच्याकडून व्याजाची रक्कम येणे आहे. यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेत प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सहायक निबंधक अमित गराडे यांच्याकडे केली आहे. सभासद पाडुरंग लोखंडे, केदारी आसवले, ज्ञानप्रकाश रेडेकर, माजी संचालक दत्तू कांबळे, आप्पाजी पाटील, राजेंद्र आसवले, धनाजी पाटील, प्रभाकर रेडेकर यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. फेरलेखापरीक्षणात संगनमताने गैरव्यवहार झाल्याचे अपर लेखापरीक्षकांनी अहवाल दिला आहे. थकबाकीदार सभासदांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. सभा घेतलेल्या नाहीत. कार्यक्षेत्रात खाडाखोड केली आहे. उपविधीचे उल्लंघन करून सभासदत्व दिले आहे. संचालक मंडळाच्या सभा उपविधीनुसार घेतलेल्या नाहीत. या कारणामुळे संस्थेवर प्रशासक नियुक्तीची गरज निवेदनातून व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police ASI
Tariq Garden building collapse
Police officer taking bribe near police station
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
Marathi News Esakal
www.esakal.com