गड- ह्रदयावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

गड- ह्रदयावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
Published on

67465
महागाव ः संत गजानन महाराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ. शेखर भिसे, डॉ. यशवंत चव्हाण व त्यांचे पथक.

''संत गजानन''मध्ये हृदयाची
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
महागाव, ता. १ ः येथील संत गजानन महाराज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हृदयावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ''शॉकवेव लिथो ट्रीपसी''च्या माध्यमातून रक्तवाहिनीत साचलेले कॅल्शियम काढून तिन्ही रक्तवाहिन्या प्रवाहित केल्या. बायपासला बायपास करणारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला. ही शस्त्रक्रिया धर्मादाय निधीतून करण्यात आली.
अडकूर येथील येथील ७५ वर्षीय वृद्ध महिलेला हृदयविकार धक्का बसल्याने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तिन्ही वाहिन्या कॅल्शियमने भरलेल्या होत्या. त्यातील मुख्य रक्तवाहिनी ९० तर इतर दोन्ही ९५ टक्के बंद होते. बायपासची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. अशावेळी येथील तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने शॉकवेव लिथो ट्रीपसी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रक्तवाहिनीत साचलेले कॅल्शियम फोडण्यासाठी मुंबईहून खास यंत्र मागविण्यात आले. त्याच्या साहाय्याने बायपासला बायपास करणारी अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तीन ते साडेतीन तास करून रुग्णाला जीवदान दिले. यासाठी तज्ज्ञ डॉ. शेखर भिसे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. विनायक कांबळे, डॉ. रोहिणी जगताप, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. रुपाली कोरी यांच्या पथकाने परिश्रम घेतले. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. यशवंत चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com