

67506
हाजगोळी (ता. आजरा) या बंधाऱ्यावरील स्लॅबबाहेर आलेल्या लोखंडी सळई.
हाजगोळी बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक
स्लॅबच्या सळई उघड्यावर : डागडुजी करण्याची गरज
आजरा, ता. १ : तालुक्यातील हाजगोळी बंधाऱ्यावर खड्डे पडल्याने स्लॅबच्या लोखंडी सळई बाहेर आल्या आहेत. पावसात पाणी खड्ड्यात साचल्याने सळ्या वाहनधारकांना दिसणार नाहीत. त्यामुळे दुचाकी व चार चाकीचे अपघात होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याच्या स्लॅबची डागडुजी करण्याची गरज आहे.
शेतीच्या पाण्यासाठी बंधारा उभारण्यात आला. सध्या या बंधाऱ्यावरून सात-आठ गावांना वाहतूक सुरू आहे. एसटी वाहतुकीबरोबर खासगी वाहनांची रहदारी आहे. हजगोळी खुर्द, हाजगोळी बुद्रुक, भादवण, पेर्दवाडी, कोवाडे, निगुडगे, सरोळी या गावांची सोय झाली आहे. आजरा या तालुक्याच्या गावासाठी येण्याकरिता जवळचा मार्ग असल्याने नागरिक, नोकरदार, विद्यार्थी या बंधाऱ्याहून ये-जा करतात. त्यामुळे या बंधाऱ्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणात चालते. स्लॅबमधील सळई बाहेर आल्यामुळे अति पावसात हा बंधारा धोकादायक झाला आहे. त्यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेता पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यावरील स्लॅबवर पडलेले खड्डे बुजवून डागडुजी करण्याची गरज आहे.
* कोट
काही ठिकाणी पडलेल्या खड्ड्यातील बंधारावरील सळ्या बाहेर आल्या आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेता. सिमेंटने खड्डे भरून घेतले जाणारा असून, बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी प्रस्ताव केला आहे.
- अजिंक्य आबिटकर, शाखा अधिकारी पाटबंधारे. आजरा
* चौकट
संरक्षण कठड्याची गरज
मागील दोन वर्षांपूर्वी बंधाऱ्यावर पडलेले खड्डे व संरक्षण कठडा याबाबत ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली होती. काही खड्डे बुजवण्यात आले, पण संरक्षण कठडा अद्याप झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.