

हेल्थ पुरवणी
-----------
आयुर्वेद उपचाराने
मलावरोधातून वेळीच बरे व्हा
लीड
कॉलेजात हरहुन्नरी, गुणवंत सुरेश नोकरीला लागला, चांगली आर्थिक स्थिती होती. विवाह झाला. वय वाढले. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रसन्नतेला आळसाची छाया दिसू लागली. पोटाचा घेर वाढला, हालचाली मंदावल्या. उत्साह हरवला. शौचाला गेला, की अर्धा तास, त्याच्या कार्यशैली व नित्य जगण्याला निरुत्साहाने घेरले आयुर्वेद तज्ज्ञांकडे गेला. जवळपास दोन वर्षांपासून सुरू झालेला मलावरोध जुजबी औषधे घेत बराच काळ घालवला. मुळव्याधींनी जडली. वेळीच उपचार न घेतल्यामुळे, पथ्य न पाळल्याचा फटका उघड झाला. मलवरोधापासून सुरू झालेली आजाराची मालिका सुरेशचे व्यक्तिगत आयुष्य बाधित करणार होती. तेच गांभीर्य ओळखून त्याने आयुर्वेदतज्ज्ञांकडून उपचार करून घेत भविष्यातील गंभीर आजारातून सुटका करून घेतली.
- डॉ. संदीप बाचणकर
मलावरोध, मलावष्ठंभ (बद्धकोष्ठता ) आणि आयुर्वेदीय उपचार
शौचाला साफ न होण्याला व्यावहारिक भाषेत बद्धकोष्ठता म्हटले जाते. आयुर्वेदानुसार मलावष्ठंभ (मलावरोध) व आधुनिक शास्त्रानुसार कॉन्सटिपेशन असेही म्हटले जाते. मलावरोध विकार अलीकडच्या काळात वाढत आहे. मलावरोद हाच अन्य बहुतेक आजारांचे मूळ आहे. म्हणून मलावरोध प्रवृत्ती वाढू लागली आहे.
ज्यादिवशी तुम्हाला शौचाला साफ झाले नसेल. बहुतेकांना सर्वांना असा अनुभव येतो, काहींना आठवड्यात एक दोन वेळा, काही महिन्यांतून दोन-तीन वेळा तर काहीना नियमितपणे असा अनुभव येतो.
मलावरोध झाल्यास सर्वांग गळून जाते. पोट गच्च वाटू लागते. डोकेदुखी उत्साह जाणवत नाही. झोपून राहावेसे वाटते. ज्या दिवशी शौचालयास साफ झालेले असेल त्यादिवशी दिवसभर उत्साह जाणवतो. अवघड कामे सहजतेने होतात, मन प्रसन्न राहाते. सकाळी उठल्यानंतर शौचाला साफ होणे महत्तवाचे असते. किंबहूना तंदुरुस्त आरोग्याचा मार्ग उपयुक्त ठरतो.
-मलावरोधाची कारणे
अवेळी खाणे, पहिले खालेले अन्न पचन होण्यापूर्वी दुसऱ्यांदा अन्न खाणे, प्रमाणापेक्षा अधिक किंवा कमी खाणे, गरजेपेक्षा अधिक पाणी पिणे, अतिथंड पदार्थ खाणे, जेवणानंतर किंवा जेवणासोबत आईस्क्रीम, शितपेये, अतिथंड पाणी पिणे, अतिजड पदार्थ खाणे, मसालेदार तळलेले पदार्थ अति खाणे, अत्याधिक मांसाहार करणे, शिळे अन्न खाणे, बेकरी पदार्थ जास्त खाणे, आंबलेले पदार्थ खाणे, फास्टफूड अति खाणे, अति चहा पिणे, व्यायामाचा अभाव किंवा सतत बैठकीचे काम असणे, रात्री जागरण करणे. शौचालयास अडवून ठेवणे, उपवास करणे व मानसिक कारणे अशा कारणांतून मलावरोध वाढतो.
---
-मलावरोधाची लक्षणे
पोट जड वाटणे किंवा पोट फुगी होणे, पोटात गुडगूड आवाज होणे, भूक मंदावणे, तोंडातून दुर्गंधी येणे, पोटात गॅस होणे, गुद्दव्दारातून वात दुर्गंधी येणे, शौचाला होऊही पोट साफ न झाल्याचा फिल येणे, शौच विधी वेळी जोर द्यावा लागणे, मळमळ होणे, छातीत जळजळ होणे, डोकेदुखी तोंडाला पाणी सुटणे, झोप न येणे, चिडचिडेपणा, आळस वाढणे, उत्साह कमी होणे.
--
मलावरोधाचा परिणाम म्हणून खालील रोग होण्याची शक्यता
-निद्रानाश,
-मूळव्याधी (पाईल्स),
-परिकत्रिका (फिश्चर )
-भंगदर (फिशुला)
-पोटदुखी
-शौचाची जागा (अंग) बाहेर येणे
-गुद्व्दाराचा कर्करोग
-पुरुष स्त्री संबंधावेळी शुक्र त्वरित बाहेर पडणे
- अवयव दुर्बल्य जाणवणे
-स्त्रीपुरुष सहवासातील समाधान न मिळता निराशा येऊ शकते
-मलावरोधा वेळी महिला अंगावरून पांढरे जाणे
-पाळीच्या वेळी पोटात दुखणे पाळी नियमित न येणे
मलावरोध व आयुर्वेदिय उपचार
शौचाला साप न होण्याची तक्रार सुरू होताच रुग्ण अनेकदा परस्पर औषध दुकानात जावून औषधे घेतात. त्यातून तात्पुरता फरक जाणवतो मात्र मूळ दुखणे बरे होतेच असे नाही, यातून गुंता वाढू शकतो. लक्षणे सुरू झाल्यानंतर तातडीने आयुर्वेद तज्ज्ञांशी संपर्क साधून तपासणी व वैद्यकीय सल्ला घ्यावा. दिनचर्या, सवयी आहारविहार कामाचे स्वरूप स्वभाव या विषयी माहिती आयुर्वेदतज्ज्ञांना द्यावी. जेणे करून निदान करणे सुलभ होते. वैद्यकीय तज्ज्ञांनी आहरातील सांगितलेले बदलांसह व्यायाम तसेच व्यसनापासून दूर राहणे. दिलेल्या औषधे वेळीच घेणे यातून मलोवरोध कमी होण्यास मदत होईल; मात्र कोणताही फरक न पडल्यास पंचकर्म, स्नेहन, स्वेदन, बस्ती, विरेचन असे उपचार आयुर्वेद तज्ज्ञाकडून करून घेता येतात. यासोबत पथ्य पाळल्यास चांगले गुण मिळून मलावरोध दुरू होण्यास मदत होते.
--
अशी काळजी घेता येईल
मलावरोध होऊ नये, यासाठी संतुलित आहारविहाराची जीवनशैली अवलंब आयुर्वेदा तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यात पालेभाज्या, केशर असलेल्या फळ भाजा (उदा. गाजर, बिट) ज्या-त्या हंगामानुसार येणारी फळे, स्वच्छ पाणी, दोन घास कमी खाणे, झेपल एवढा व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, योग करणे अशा नियमित जीवन शैलीतूनही मलावरोध होणे टाळता येणे शक्य आहे. ऋतुमानानुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे (उदा. उन्हाळ्यात ताक, पावसाळ्यात ताकाची कढी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.