गुणवंतांचा सत्कार

गुणवंतांचा सत्कार
Published on

70728
अडकूर : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना हणमंत पाटील. शेजारी अभय देसाई, बबन देसाई, सरपंच सचिन गुरव आदी.
-----------------------

अडकूर येथे गुणवंतांचा सत्कार
चंदगड : दहावीतील यश ही करिअरच्या दिशेने सुरुवात आहे. ते अंतिम नाही. करिअर साध्य होईपर्यंत त्यात सातत्य ठेवा, असे प्रतिपादन गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष अभय देसाई यांनी केले. अडकूर (ता. चंदगड) येथील युनिटी फाउंडेशन, मलगेवाडी (ता. चंदगड) येथील गोवास्‍थित उद्योजक हणमंत पाटील यांच्या वतीने पंचक्रोशीतील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ‘सकाळ''चे बातमीदार सुनील कोंडुसकर प्रमुख पाहुणे होते. शिवशक्ती हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मनोहर देसाई यांनी स्वागत केले. वैष्णवी कदम, ओम गायकवाड, तन्मय वागतकर, स्नेहल पाटील, सृष्टी शिवगोंडे, शुभम सावंत, वैजनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. माजी सभापती बबन देसाई, सुनील कोंडुसकर, हणमंत पाटील, सरपंच सचिन गुरव, एस. वाय. यमगेकर, व्ही. एन. सूर्यवंशी, विजयकुमार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सूर्ववंशी, दौलत कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव आदी उपस्थित होते. दिलीप भेकणे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com