

71015
हिरलगे : प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून मिरवणुकीने आणण्यात आले.
घंटा वाजली....शाळा भरली...!
प्रवेशोत्सव : बैलगाडीतून मिरवणूक, फेटे बांधून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : उन्हाळी सुटीचा कालावधी संपला. त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या. प्रवेशोत्सवाच्या नियोजनामुळे प्रत्येक शाळेत उत्साही वातावरण होते. विद्यार्थ्यांची ओवाळणी, त्यांना खाऊ, फेटे बांधून स्वागत केले. सजवलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत शाळेत आणले.
नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी जोरदार तयारी केली होती. शाळेच्या परिसराची स्वच्छता केली होती. रांगोळी टाकण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले होते. प्रवेशावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शाळेत आणले. ओवाळणी करून पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. काही शाळांनी सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत स्वागत केले. दरम्यान, आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी हनिमनाळ शाळेला भेट दिली. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी जखेवाडी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याशिवाय नायब तहसीलदार, विस्तार अधिकाऱ्यांसह ३० अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध शाळांत जात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. खासगी शाळांतही विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
--
* पहिल्या दिवशी
पाठ्यपुस्तके, गणवेश...
समग्र शिक्षा अभियानअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश, शूज व सॉक्स देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शासकीय व खासगी अनुदानित शाळांतील १८ हजार ११२ विद्यार्थ्यांना आज पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील ८ हजार ८४७ विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.