गड-विद्यार्थी घटले

गड-विद्यार्थी घटले

Published on

पाऊस वाढला, की शिक्षक कमी पडले!
‘जिप’ शाळांत यंदा १५४ विद्यार्थी घटले : पहिल्या दिवशी ९६८ विद्यार्थ्यांचा प्रवेश
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता.१७ : जिल्हा परिषदेच्या शाळांत गुढी पाडव्याच्या नोंदणीत पट वाढवता आला नव्हता, पण घट रोखण्यात यश आले होते. ही बाब तशी समाधानकारकच होती, पण शाळेच्या पहिल्या दिवशी गतवर्षीच्या तुलनेत १५४ विद्यार्थी घटले आहेत. यंदा पहिलीच्या वर्गात ९६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. पाऊस असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे सांगण्यात येते. तसे असेल तर चार-आठ दिवसांत घट भरून निघेल, पण शिक्षक कमी पडले असतील तर ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल.
जिल्हा परिषदेच्या शाळांत दरवर्षी गुढीपाडवा, प्रवेश वाढवा उपक्रम राबविला जातो. पहिलीच्या वर्गात दखलपात्र विद्यार्थ्यांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा या दिवशी प्रवेश निश्चित केला जातो. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांवर फोकस करण्यासाठी शिक्षकांना अडीच-तीन महिन्यांचा कालावधी मिळतो. या कालावधीत पालकांची वैयक्तिक भेट, शाळा व्यवस्थापक समितीच्या माध्यमातून दबाव, जिल्हा परिषदेच्या शाळांचे महत्त्व पटवून देऊन पालकांचे मनपरिवर्तन आदी माध्यमातून उर्वरित विद्यार्थ्यांचा प्रवेश कसा होईल, यावर भर देणे अपेक्षित असते.
गतवर्षी याबाबत चांगले काम झाले होते. १,४६७ विद्यार्थी दाखलपात्र होते. यातील ८८१ विद्यार्थ्यांचे गुढीपाडव्याला प्रवेश झाले होते. हा आकडा शाळेच्या पहिल्या दिवशी १,१२२ पर्यंत पोचला होता. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. दाखलपात्र १,४५६ पैकी ८७३ विद्यार्थ्यांचे गुढीपाडव्याला प्रवेश झाले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशाचा आकडा ९६८ वरच अडकला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५४ विद्यार्थ्यांची घट आहे. सोमवारी (ता.१६) असलेल्या पावसामुळे अनेक विद्यार्थी शाळेत आले नसल्याचे सांगितले जात आहे.

चौकट...
* घटत्या जननदराचा मुद्दा बाजूला...
जिल्हा परिषदेच्या शाळांतील घटत्या पटसंख्येचा मुद्दा पुढे येतो त्यावेळी घटत्या जननदराचीही चर्चा होते. पटसंख्या कमी होण्यासाठी घटता जननदर, स्थलांतर कारणीभूत मानले जाते. पण, गतवर्षी दाखलपात्र विद्यार्थी १,४६७ होते. यंदा ही संख्या १,४५६ इतकी आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर नगण्य फरक आहे. या आकडेवारीचा विचार करता आता घटता जननदर आणि स्थलांतराचा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com