कॉंग्रेस निवेदन

कॉंग्रेस निवेदन

Published on

71541
--
प्रभाग रचनेत सत्ताधारी, निवृत्तांचा हस्तक्षेप
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप; प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना सत्ताधाऱ्यांचा दबाव घेऊ नका. महापालिकेतील निवृत्त अधिकारी व काही कारभाऱ्यांच्या मदतीने हवी तशी प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. याबाबत झालेल्या काही प्रकारांची माहितीही प्रशासकांना देण्यात आली.
शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज प्रशासकांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते. यावेळी प्रभाग रचनेबाबत प्रचंड दबाव आणला जात आहे. प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दबाव आणला जात आहे. राजारामपुरीतील काही ठिकाणी बसून प्रभाग रचनेचे नियोजन केले जात आहे. महापालिकेतील निवृत्त अधिकारीही सहभागी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया कोणत्याही राजकीय दबावाखाली होऊ नये. त्यात पारदर्शकता असावी. प्रत्येक प्रभाग रचनेवर आमचे लक्ष राहणार आहे, असे निवेदन देताना सांगण्यात आले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे १३० मंजूर पदे आहेत; पण त्यांपैकी कायम १५ व ठोक मानधनावरील ४३ इतकेच फायरमन कार्यरत आहेत. अशा अपुऱ्या मनुष्यबळामुळे आपत्ती व्यवस्थापनात अडचणी येत आहेत. ठोक मानधनावरील फायरमन अनेक वर्षांपासून कमी पगारावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशीही मागणी कली. शिष्टमंडळात संजय मोहिते, भूपाल शेटे, दुर्वास कदम, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे, जय पटकारे, शोभा कवाळे, श्रावण फडतारे, शिवानंद बनछोडे, धीरज पाटील, दिग्विजय मगदूम, अभिजित देठे, फिरोज सौदागर, उमेश पोवार, उत्तम शेटके, रियाज सुभेदार, संजय लाड आदी उपस्थित होते.

--
एक हजार पथदिवे आले
यापूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची शहरातील विविध प्रश्‍नांबाबत महापालिकेत बैठक झाली होती. त्यावेळी एक हजारांवर बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे एक हजार दिवे आल्याची माहिती दिली. लवकरच हे नवीन दिवे बसवण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले.
.....
आरक्षित जागा
उठवण्याचा प्रकार
महापालिकेकडून तिसरी विकास योजना तयार करण्यात येत आहे. त्यात विविध विकासकामांसाठी आरक्षणे ठेवली आहेत. या योजनेत ती आरक्षणे उठवण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यात लक्ष घातले नाही तर आरक्षित ठेवलेल्या जागा दिसणार नाहीत. त्यामुळे प्रशासकांनी या योजनेच्या सुरू असलेल्या कामात लक्ष घालावे, अशी मागणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com