आत्मा गट शेती
लोगो- गट शेतीचा नफा-तोटा भाग २
आत्माच्या प्रक्रिया उद्योगाची चंदगडमध्ये ऊर्जा
नाचणी, काजूंवर स्थानिक पातळीवर उपउत्पादने ः तालुक्यात सात कोटींचे प्रकल्प
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः चंदगड तालुक्यात आत्मा प्रकल्पाच्या दोन योजनांतून शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांच्या शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढ नफ्यासोबत रोजगाराची संधी मिळाली आहे. यात आत्माचा नाचणी प्रकल्प तेजीत आहे. स्मार्ट योजनेतील अन्य तीन प्रक्रिया उद्योग प्रारंभाच्या उंबरठ्यावर आहेत. यातून चंदगडमध्ये जवळपास सात कोटींच्या प्रक्रिया उद्योगातून हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
चंदगड तालुक्यातील मेंडेदुर्ग गाव डोंगरी, जंगली भाग आहे. डोंगर उतारावर शेतीत भात पीक मोठ्या प्रमाणात होते. काही प्रमाणात ऊस, काजूच्या बागा अशी पारंपरिक पिके घेतली जात होती. काही वर्षांत मात्र नाचणी उत्पादन घेतले जाऊ लागले. नाचणी आरोग्यदायी तृणधान्य असल्याने नाचणीची मागणी वाढती आहे. नाचणीचे उत्पादन आहे; मात्र त्याची बाजारपेठ नव्हती. त्यामुळे त्याच्या विक्रीचा प्रश्न होता. येथे शेतकरी गटाने नाचणी प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्यासाठी आत्मा व स्वयंसेवी संस्थेकडून नाचणी प्रक्रिया प्रशिक्षण घेतले. यंत्रसामुग्री उभारली. साधारण १५० एकरांतील नाचणी उत्पादन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करता येईल इतक्या क्षमतेचा प्रकल्प उभारला. यातून नाचणीपासून बिस्किटे, नाचणी लाडू, नाचणी चॉकलेट, नूडल्स असे नाचणीचे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत.
तालुक्यातील नाचणी उत्पादकांना स्थानिक पातळीवर नाचणी प्रक्रिया करून घेऊन त्यातून नफा कमावण्याची संधी मिळाली. जवळपास दीडशेंवर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना या प्रक्रिया उद्योगाचा लाभ होणार आहे. त्यासाठी मशिनरी आली. बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी सभासद उत्पादित शेतीमाल या प्रक्रिया प्रकल्पासाठी देणार आहेत. त्यासाठी करार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतीमाल प्रक्रिया, बाजारपेठ, विपणन, रोजगार व नफा असे चौरंगी लाभ आत्माच्या योजनेतून मिळणार आहेत.
--
*आत्मा प्रकल्पातील स्मार्ट योजनेतील दुसरे प्रकल्प असे-
- चंदगड तालुक्यातील सुंडी येथे काजू प्रक्रिया प्रकल्प.
- तांदूळ प्रक्रिया प्रकल्प सुरू होत आहेत.
- सातवणे येथे नाचणी प्रक्रिया प्रकल्प सुरू होत आहेत.
- कदनूर येथे काजू बिया (गर) प्रकल्प सुरू आहे.
- प्रकल्पासाठी जवळपास प्रत्येकी २५ लाख ते ८९ लाखांपर्यंतच्या अनुदानाचा एक टप्पा दिला आहे.
- पावणेदोन कोटी ते तीन कोटींचा प्रकल्प खर्च अपेक्षित आहे.
- एका कंपनीत २५० शेतकरी सभासद आहेत.
कोट
चंदगड तालुक्यात मेंडेदुर्ग येथे २०१७-१८ ला शिवमुद्रा शेतकरी गट स्थापन केला. तेव्हा २० शेतकरी होते. शेतकऱ्यांनी नाचणी, काजू उत्पादन प्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्या प्रकल्पाचे सादरीकरण तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झाले, तेव्हा त्यांनी नाचणी प्रकल्पाला मंजुरी दिली. तेव्हा नाचणीचे पीक चंदगडमध्ये होत होते. नाचणी आरोग्यदायी असल्याने मागणी उलाढालीचा अंदाज घेऊन नाचणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. २० शेतकऱ्यांनी गटाने कंपनी स्थापन केली. आज दोन हजार शेतकरी कंपनीचे सभासद आहेत.
- गणपती पवार, शेतकरी गट अध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.