‘जिवबानाना पार्क ते नंदवाळ’हा संत तुकाराम महाराज मार्ग व्हावा

‘जिवबानाना पार्क ते नंदवाळ’हा संत तुकाराम महाराज मार्ग व्हावा

Published on

72056
......................

‘जिवबानाना पार्क ते नंदवाळ’रस्त्याचे
तुकाराम महाराज मार्ग नामकरण करा
संत तुकाराम महाराज भक्ती मार्ग विकास नागरिक समितीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : जिवबानाना जाधव पार्क ते नंदवाळ रस्ता दुरुस्त करून त्यास जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी आज जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज भक्ती मार्ग विकास नागरिक समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, राधानगरी रोडवर वाशीपासून नंदवाळकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
अलीकडच्या काळात नंदवाळ हे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध पावत आहे. प्रत्येक एकादशीला ही संख्या वाढते. आषाढी वारीच्या वेळी तर चालत जाणेही अवघड होते. वाहने वाशीपासून पुढे मागे दोन किलोमीटर अंतरावर थांबवावी लागतात; एवढी गर्दी होते. त्याचबरोबर नंदवाळमध्ये पोलिस खात्याचे एसआरपी प्रशिक्षण केंद्र झाले आहे. त्यांच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. वाहतुकीवर ताण पडतो. वाशी नंदवाळ रस्त्याशिवाय नंदवाळवरून कोल्हापूरला जायला एक कच्चा रस्ता आहे. तो जिवबानाना जाधव पार्क येथे मिळतो. त्यामुळे जिवबानाना पार्क ते नंदवाळ असा रस्ता पक्का झाला तर वाहतुकीवरील ताण कमी होईल. जिवबानाना पार्कपासून एक किलोमीटरचा रस्ता पक्का डांबरी झालेला आहे. त्यापुढील दीड किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. कोल्हापूर नंदवाळ अंतर एक किलोमीटरने कमी होईल. तेव्हा उर्वरित रस्त्यावर भर घालून तो वाहतुकीस योग्य करावा. कोल्हापूरमध्ये संत तुकारामांच्या नावे रस्ता किंवा चौक नाही, तेव्हा या नियोजित रस्त्याचे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मार्ग असे नामकरण करावे.
शिष्टमंडळात चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, आनंदराव चौगुले, अमर जाधव, वैशाली जंगम, विकास जंगम, विजय साळुंखे, जगन्नाथ सूर्यवंशी, सुहास साळुंखे, रमेश वडणगेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय निकम, चंद्रकांत बागडी आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com