योग दिन पट्टा

योग दिन पट्टा

Published on

योग दिन उत्साहात साजरा
-
शेडशाळ न्यू इंग्लिश स्कूल
जयसिंगपूर : शेडशाळ (ता. शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा झाला करण्यात आला. मुख्याध्यापिका माणिक नागावे यांनी संजय लाड यांचे स्वागत केले. श्री. लाड यांनी योगासनाचे विविध प्रकार सूर्यनमस्कार, पद्मासन, ताडासन, भुजंगासन, प्राणायाममध्ये भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका, अनुलोम-विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम असे विविध प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. सुदर्शन तकडे व त्यांची कन्या यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी पालक चंद्रकांत वंटे, अनिल नाईकवाडे, शितल भतगे, महेश गंगाधर आदी उपस्थित होते.

जयसिंगपूर शहर, परिसर

जयसिंगपूर : शहर व परिसरातील नगरपालिका, जिल्हा परिषदेसह खासगी, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत योग दिन साजरा झाला.
जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिन साजरा झाला. पर्यवेक्षक विनोद मगदूम यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. पद्मभूषण भरमगोंडा यांनी विविध व्यायाम प्रकार, उभ्या स्थितीतील योगासने, बैठ्या स्थितीतील योगासने, प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली व सर्व विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. मुख्याध्यापक दीपक वाडकर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्ततर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अनिता चौगुले यांनी केले.
ज्ञानगंगा स्कूल व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये डॉ. अतिक पटेल यांच्या उपस्थितीत योगाचे प्रात्यक्षिक झाले. मुख्याध्यापक संध्या चावरे, मुख्याध्यापिका स्मीता उपाध्ये, सुनील महाजन, भीमा गायकवाड, अमर पाटील आदी सहभागी झाले.

जयसिंगपूर महाविद्यालय
जयसिंगपूर महाविद्यालयात योग दिन साजरा झाला. प्रा. अमृता पाटील यांनी प्रात्यक्षिके सादर केली. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत केले. प्रा. सुशांत पाटील व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केले. योग शिबिरात कॉलेजचा प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले यांनी केले.

पट्टणकोडोली अनंत संकुल
पट्टणकोडोली : अनंत बालमंदिर अनंत विद्यामंदिर व न्यू इंग्लिश स्कूल राजापूर या शैक्षणिक संस्थेमार्फत योग दिन साजरा झाला. १३०० मुलांना योगाचे धडे देण्यात आले. योगगुरू चेतन मोरे व सूरज खरात, सर्वेश हजारे यांनी सूर्यनमस्कार, यासह विविध आसने घेतली; तर लहान गट ते दुसरीपर्यंतच्या मुलांना प्राणायाम ध्यानधारणा शिकवण्यात आली. मुख्याध्यापक एम. एस. पाटील. टी. एच. आकुर्डे, सचिव दादासाहेब शिरगुप्पे आदींनी सहभाग घेतला.

मणेरे हायस्कूल
कबनूर ः डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे, मार्गदर्शक अशोक वसगडे यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक व हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांनी योगदिनाचे महत्त्व सांगितले.
योगशिक्षक संजय भडाळे, छाया टेके, अश्विनी हांडे, संगीता लडगे, मलिक मणेर, प्रवीण गवळी, सदाशिव खोत यांनी योग प्रात्यक्षिक करून घेतली.
मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे, प्राचार्या वैशाली मंगसुळे आदी उपस्थित होते. जवाहरनगर हायस्कूल, जवाहरनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महावीर करव होते. बी. टी. ऐनापुरे यांनी स्वागत केले. यावेळी योगशिक्षक दिनेश चव्हाण, दक्षता चव्हाण, महेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके केली. सहदेव गाडेकर यांनी आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक आर. आर. जाधव, जिमखानाप्रमुख ए. एस. कांबळे, एस. बी. चव्हाण आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब डांगे महाविद्यालय
कबनूर ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात योगशिक्षिका डॉ. भाग्यश्री वठारे यांनी योगाचे महत्त्व सांगून योग प्रात्यक्षिके करून घेतली. प्रभारी प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा शिक्षक प्रा. संदीप लवटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अमोल महाजन यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. एकनाथ पाटील, प्रा. डॉ. अशोक जाधव, प्रा. डॉ. विकास विधाते, प्रा. रवींद्र पडवळे, प्रा. भीमसेन कारवेकर, प्रा. शहाजी गडदे,
प्रा. दिगंबर कुलकर्णी, प्रा. सुनीता पाटील आदी उपस्थित होते.
-
कुरुंदवाड शहर, परिसर
कुरुंदवाड ः शहर व परिसरात विविध उपक्रमांनी योग दिन साजरा झाला. शाळा, महाविद्यालये, जिम आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त सहभागातून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. एस. पी. हायस्कूल, सैनिक पॅटर्न स्कूल, कुमार कन्या विद्यालय १ व २, ५६ महाराष्ट्र बटालियन फोर्स यांच्यासह इतर अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. विविध शाळांमध्ये योग प्रार्थना, सूर्यनमस्कार, ध्यान आणि श्वसन तंत्रांचे प्रात्यक्षिक तसेच मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. व्यंकटेश्वरा जिम येथे १०८ सूर्यनमस्कारांच्या विक्रमी सत्राचे आयोजन करण्यात आले. यात अनेक तरुण योगाभ्यासींनी सहभाग नोंदवून एकजूट आणि शिस्तीचा आदर्श घालून दिला. यावेळी ओम सातपुते, सचिन मोहिते, जिमी घोरपडे, प्रसाद रिसबूड, प्रसन्नजित सातपुते यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
-
हातकणंगले परिसर
हातकणंगले ः योग दिनाच्या निमित्ताने इचलकरंजी येथे रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि योग व जिम्नॅशियमतर्फे येथे १०८ सूर्यनस्कार संकल्प पूर्ण केला.
व्यवस्थापक संजय कांबळे व रिलायन्सचे व्यवस्थापन योगेश जेरे, भारत केटकाळे, अतुल मंडपे, महेश निकम, राहुल हिरेमठ, राजेंद्र घोडके आणि योग भवनचे कपिल करडे आणि संदेश कांबळे यांचे सहकार्य लाभले. माध्यमिक विद्यालय, हातकणंगले विद्यालयात तानाजी चोपडे यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, प्राणायाम तसेच वेगवेगळे योग आसने, सोप्या पद्धतीने करून घेतले.

इचलकरंजी शहर, परिसर
इचलकरंजी : योग दिन आणि संगीत दिनाचे औचित्य साधत इचलकरंजी शहरात विविध संस्थांच्या माध्यमातून योग दिन विविध उपक्रमांमधून साजरा करण्यात आला. राजाराम स्टेडियम, पंचगंगा नदीकाठ आणि महेश क्लब, शहीद भगतसिंग उद्यानसह शाळा, महाविद्यालय परिसरात दिवसभर योगाचे वातावरण पाहायला मिळाले. राजाराम स्टेडियम येथे इचलकरंजी महापालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग, इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, पतंजली योग समिती, आय ॲम
फिट क्लब आणि रिंगण फिटनेसतर्फे योग शिबिराचे आयोजन केले होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
रेणुका मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षातर्फे योग दिन साजरा झाला. माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदींनी सहभाग घेतला.
‘सूर्यनमस्कार महायज्ञ’ महेश क्लब ऑफ इचलकरंजी आणि एसएसवाय मित्र परिवारातर्फे आयोजित केला. महेश क्लब येथे दिवसभर कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून सहभाग नोंदवला. ‘गायत्री यज्ञ’ झाला. सकाळी ६.वाजून ४ मिनिटांनी सुरू झालेला योग कार्यक्रम सूर्यास्तापर्यंत सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटापर्यंत सुरू राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com