प्लॅस्टिकने वाढतेय प्रदुषण;बिघडतय पर्यावरण

प्लॅस्टिकने वाढतेय प्रदुषण;बिघडतय पर्यावरण

Published on

बिगस्टोरी - लोगो
प्रवीण देसाई

फोटो मोठा करणे 73111 किंवा 73106
----
73110
--
फोटो
72942
72943
----
प्लास्टिक.... वाढवतंय प्रदूषण;
बिघडवतंय पर्यावरण...
कचऱ्यातील मुख्य समस्या; मानवी आरोग्यास, कारवाईनंतर पुन्हा वापर सुरू
----

लीड
प्लास्टिकचा परिणाम काय होतो? याची झलक यंदाच्या पावसाळ्यात दिसून आली. मोठ्या पावसात शहरातील ५० टन कचरा वाहत जाऊन पंचगंगेच्या राजाराम बंधाऱ्यात अडकला. तर अन्य १० टन कचरा शहरातील विविध चौकांत साचून असा सुमारे ६० टन प्लास्टिक कचऱ्यांमुळे शहर तुंबले होते. महापालिका यंत्रणेने हे प्लास्टिक गोळा करून नष्ट केले; परंतु हे संकट पुन्हा येणार नाही? याची खात्री देता येईल का?, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरात एकल वापर प्लास्टिकवर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वारंवार कारवाई करूनही ते निर्ढावले आहेत. आतापर्यंत लाखोंचा दंड वसूल करूनही या व्यापाऱ्यांवर परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. हेच प्लास्टिक प्रदूषण वाढवत आहे. पर्यावरण बिघडवत असून मानवी आरोग्यास धोकाही पोहोचवत आहे.
---

शहरात प्लास्टिक कचरा बंदी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीअंतर्गत प्लास्टिक बंदीबाबत विविध शासन निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक प्लास्टिक आणि प्लास्टिक सदृश फ्लोटिंग साहित्याचा वापर यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. पावसाळ्यात गटारी आणि नाल्यांत हे प्लास्टिक अडकून राहिल्यामुळे महापुरास कारणीभूत ठरत आहे. एकल वापर प्लास्टिकच्या बंदीबाबत कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे आदेशही सरकारकडून दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने याप्रकरणी २०१६ नंतर आतापर्यंत सातत्यपूर्ण कारवाई केली आहे. यामध्ये संबंधित प्लास्टिक विक्रेत्यांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे; परंतु प्लास्टिकची विक्री अद्याप थांबलेली नाही. हे संबंधित विक्रेते, व्यापारी दंड केल्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसांनी पुन्हा प्लास्टिक साहित्य विक्रीसाठी बाजारात पाठवतात. यावरून महापालिकेच्या कारवाईचा शून्य परिणाम त्यांच्यावर दिसत आहे.


चौकट....
शहरात प्लास्टिक
बंदीबाबत आवाहन
पर्यावरण दिनादिवशी सरकारने प्लास्टिक वापराच्या बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली. अडीचशेपेक्षा अधिक वाहने आणि किमान ७०० कर्मचाऱ्यांद्वारे कोल्हापूर शहरातील नागरिकांना प्लास्टिकबंदीबाबत आवाहन केले. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अलीकडेच करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे संबंधित परिसरातील सर्व व्यापारी यांच्या समवेत बैठक घेतली. यात अंबाबाई मंदिर परिसरात १० जूनपासून १०० टक्के प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात येत असल्याचे जाहीर केले; परंतु याची किती अंमलबजावणी होते? हे पाहावे लागणार आहे.


नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा
शहरातील जयंती नाला, गोमती नाला, आणि शाम सोसायटी नाला या प्रमुख नाल्यांवरील भागात म्हणजे नदी संगम स्थानापासून उगमस्थानापर्यंत रस्त्यावर जेथे जेथे पूल उभारले आहेत. या नाल्यांच्या काठावर सर्वाधिक प्लास्टिक, फ्लोटिंग मटेरिअल, चामड्याच्या वस्तू बनवणारे, उशी आणि गाद्या बनवणारे, तसेच स्क्रॅप आणि भंगार सामान घेणारे दुकानदार, यांची दुकाने उभारली आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फ्लोटिंग साहित्य, काचेच्या वस्तू, प्लास्टिक आणि इतर घातक वस्तू, काहीप्रसंगी बायोमेडिकल वेस्ट आणि त्याचबरोबर थर्माकोलसारख्या वस्तू ओढे आणि नाल्‍यांत फेकून देतात. यामुळे प्रदूषण होऊन शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याशिवाय पावसाळ्याच्या कालावधीत महापुराच्या वाढीस हे दुकानदार आणि घटक कारणीभूत ठरत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.
.........................

कापडी पिशव्यांसाठी
महापालिकेचा पुढाकार
महापालिकेमार्फत शहरातील सर्व एकल वापर प्लास्टिक विक्रेते, व्यापारी, तसेच प्लास्टिक पिशव्या करणाऱ्या नागरिकांना प्लास्टिक पिशव्या न वापरता पर्यायी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा, कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. एकल प्लास्टिक पिशव्यांचा व वस्तूंचा अतिवापर पर्यावरणासाठी एक मोठी समस्या बनली आहे. या पिशव्या जमिनीत लवकर कुजत नाहीत, त्यामुळे मातीचे प्रदूषण होते आणि गटारे, नाले तुंबतात. संपूर्ण शहराला प्लास्टिक पिशव्यांमुळे मोठा धोका निर्माण होत आहे. याशिवाय, प्लास्टिक जाळल्यास विषारी वायू वातावरणात मिसळून हवा प्रदूषित होते. दुकानातून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा इतर पर्यावरणास अनुकूल पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन दिले, तर यामुळे मोठा सकारात्मक बदल घडून येईल. व्यापारी, दुकानदारांनी ग्राहकांना स्वतःची पिशवी घेऊन येण्याची विनंती करावी. नाममात्र शुल्कात पर्यावरणास अनुकूल पिशव्या ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्यात. या प्रयत्नांमुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर दुकानांची पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी दिसून येईल, असा संदेश दिला आहे.
.......................................................

प्लास्टिक विकणाऱ्यांना
तीन महिन्यांचा तुरुंगवास
घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ आणि २०२२ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सलग तीनवेळा एखादा दुकानदार आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक किंवा वैयक्तिक विक्रेता जर प्लास्टिक विकताना सापडला, तर त्याला २५ हजार रुपये दंड, प्लास्टिक जप्ती आणि फौजदारी गुन्हा व तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे.
.............................................

प्लास्टिकऐवजी हे वापरावे
एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. यात कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरॅमिक्सच्या प्लेट्स, वाट्या यांचा समावेश आहे. याचा वापर नागरिकांनी केल्यास प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण थांबणार असून, पर्यावरणाची हानी टळणार आहे.
..............................
वापर प्लास्टिकच्या
या वस्तूंवर बंदी
केंद्रीय पर्यावरण मंत्रायलयाने ऑगस्ट २०२१ मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार पुढील एकल वापर प्लास्टिकच्या वस्‍तूंवर बंदी घातली आहे.
* सजावटीसाठीचे प्लास्टिक व थर्माकोल
* मिठाईचे बॉक्स, आमंत्रण पत्रिका
* सिगारेटच्या पाकिटांवरील प्लास्टिक आवरणे
* प्लास्टिकच्या काड्या
* प्लास्टिकचे झेंडे
* कँडी काड्या
* आईस्क्रिम काड्या
* प्लेट्स, कप, पेले, काटे, चमचे, चाकू,स्ट्रॉ
* १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हसी बॅनर्स
* कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरी पिशव्या वगळून)
* सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या,
* डिश, बाऊल व कंटेनर आदी
.......................................................

महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्लास्टिकची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून आठ वर्षांत सुमारे १६ लाख ७० हजारांचा दंड वसूल केला आहे तो असा :
* २०१८ मध्ये ४ लाख १५ हजार
*२०१९ मध्ये ३ लाख ७५ हजार
* २०२० मध्ये २ लाख ५० हजार
*२०२१ मध्ये ६५ हजार
* २०२२ मध्ये १ लाख ६० हजार
*२०२४ मध्ये २ लाख ७५ हजार,
*२०२५ मध्ये (आतापर्यत) १ लाख ३० हजार
* एकूण : १६ लाख ७० हजार


दृष्‍टिक्षेपात..
- व्यापाऱ्यांकडून महापालिकेच्या कारवाईला ठेंगा
- महापुराच्या संकटाला प्लास्टिक ही कारणीभूत
- प्लास्टिकचा मानवी आरोग्यास धोका
- प्लास्टिकमुळे होतेय पर्यावरणाची हानी
- प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर व्हावा
- १ जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर संपूर्ण देशात बंदी
....................................................................

कोट...

72947
प्लास्टिकमुळे प्रदूषणात भर पडत आहे. मानवी आरोग्यासही ते धोकादायक आहे. ते गटारी, नाले, ओढ्यांत अडकून मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून महापुराचे संकट निर्माण होत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. यात एकल वापर प्लास्टिकला बंदी आहे. तरीही त्याची चोरून विक्री करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकून कारवाई केली जात आहे. त्यांना दंड ही केला जात आहे; परंतु पुन्हा एक-दोन दिवसांनी संबंधित व्यापारी, दुकानदार पुन्हा प्लास्टिक साहित्य विक्रीसाठी बाजारात पाठवत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करण्याऐवजी त्या दिवशी सापडलेले सर्व प्लास्टिक साहित्य महापालिकेच्या कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील श्रेडिंग मशीनच्या साहाय्याने नष्ट करण्याची कारवाई केली जात आहे. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत २८ हजार टनांपेक्षा जास्त प्लास्टिक नष्ट केले आहे.
- कृष्णा पाटील, सहायक आयुक्त, महापालिका
.............................................................
72948
सर्वत्र प्लास्टिकच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. याचा परिणाम थेट माणसाच्या जीवनावर होत आहे. काही अंशी प्लास्टिक हे वरदान आहे; परंतु याचा अतिवापर आणि गैरवापर केल्यामुळे प्लास्टिक शाप ठरत आहे. येणाऱ्या पिढीसाठी, सध्या स्टाईल म्हणून किंवा कुठेही कसलीही खरेदी केली, तर अगदी सहजरीत्या प्लास्टिक पिशवीची मागणी करतो. पूर्वी असे नव्हते. कापडी पिशव्यांचा वापर जास्त होता; परंतु मागणी तसा पुरवठा, जसा बाजारपेठेचा नियम आहे. तसे नागरिकांकडूनच जर मागणी वाढत राहिली तर उत्पादकांना पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बेसुमारपणे सुरू आहे. प्लास्टिकची पुनर्निर्मिती तितक्या प्रमाणात न झाल्यामुळे असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांत प्लास्टिक वापराबाबत स्वयंशिस्त लागणे ही काळाची गरज आहे.
- अमोल बुढ्ढे, अध्यक्ष, वृक्षमित्र संघटना.
----
72945
अतिप्रमाणात प्लास्टिकचा वापर हा प्रश्न सर्वांसाठी दररोज नवीन आव्हाने निर्माण करत आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व सर्वांत महत्त्वाचे वापरानंतरच्या विल्हेवाटीसाठीची पद्धत अवैज्ञानिक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून तयार करण्यात येणारी साहित्य निर्मिती महागडी आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर अटळच आहे. कचरावेचकांकडून गोळा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रॅपर्स हे कोरडे असल्यामुळे त्यांना ते पुनर्वापरासाठी देणे शक्य आहे. वापरातील कोणतेही प्लास्टिक कोरडे ठेवून त्यांचे इतर ओल्या कचऱ्यापासून विलगीकरण केले, तर त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकची समस्या राहणारच नाही. सरकारने प्लास्टिकच्या विलगीकरणासाठी जागा व शॉर्टिंग शेड उपलब्ध करून दिले, तर प्लास्टिकवर प्रक्रिया करता येईल.
- अनुराधा भोसले, अध्यक्ष, अवनि संस्था
.................................................
72944
प्लास्टिकचा कचरा कुठेही फेकणाऱ्यांचे छायाचित्र काढून संबंधित अॅपवर पाठवणाऱ्यांना प्रशासनाने २०० रुपये बक्षीस द्यावे. कचरा फेकणाऱ्यांची ‘दैनिकां''मध्ये प्रसिद्धी द्यावी. त्यांचा शोध घेणे सोपे होईल. त्यांच्यावर कारवाई केल्यास प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद होईल व कचरा फेकणेही बंद होईल. लग्न समारंभात सर्रास पाण्यासाठी प्लास्टिकचे पातळ पेले, चमचे, पत्रावळीवर पातळ थर असतो. याला गरम पदार्थाचा स्पर्श झाला की, प्लास्टिकचे कण पोटात जातात. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. नागरिकांनी प्लास्टिकचे चहा कप वापरू नयेत. बाजारात जाताना कापडी पिशव्या सोबत घ्याव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी बाजारातून वारंवार पाण्याच्या बाटल्या घेऊ नयेत. त्याऐवजी घरातूनच पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन त्या सोबत ठेवाव्यात. लहान मुलांचे प्रबोधन व्हायला हवे. शाळेतच त्यांना प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सर होतो, हे सांगितले पाहीजे.
- चंद्रकांत चव्हाण, वृक्षमित्र व पर्यावरणप्रेमी
------
72946
जगालाच विविध प्रकारच्या प्रदूषणांचा सामना करावा लागत आहे. त्यात प्लास्टिकचे प्रदूषण सर्वांत हानीकारक आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू या स्वस्त व टिकावू असल्याने, तसेच ते प्रवासात नेणे ही सोयीचे होते. त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हेच प्लास्टिक जेव्हा कचऱ्याच्या स्वरूपात रस्त्यांवर पडते. नंतर ते गटारी, नाले, ओढ्यांत जाऊन अडकून बसते. त्यानंतर पाणी तुंबून बाहेर पडण्याचे प्रकार घडतात. प्लास्टिक नष्ट होत नाही. त्याचे सहजासहजी विघटनही होत नाही. कोल्हापूरच्या महापुरालाही प्लास्टिकही कारणीभूत ठरत आहे. यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व आपल्यासह भावी पिढीच्या उत्तम आरोग्यासाठी प्लास्टिकऐवजी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन बाहेर पडण्याचा निश्‍चय करावा.
- प्रसाद जाधव, अध्यक्ष, सिटिझन फोरम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com