

73020
अवकळीग्रस्त भरपाईसाठी
प्रयत्न करणार; मंत्री मुश्रीफ
शेतकरी कामगार पक्षातर्फे विविध मागणींचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाईपोटी गुंठ्याला ५०० रुपये प्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली. याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, शासन पातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे सूर्यफूल, भुईमूग, भात, मका, फळे, फुले, भाजीपाला या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. शासन आदेशाने नुकसानीचे पंचनामे झाले. अशा शेतकऱ्यांना गुंठ्याला पाचशे रुपये मिळावे, भाजीपाला, फळे, फुले व अन्य पिकांच्या नुकसानीसाठी गुंठ्याला एक हजारांप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीच्या आधारे शेतीमालाची खरेदीसाठी केलेली व्यवस्था अपुरी आहे. शासनाने जिल्ह्यातील आठवडी बाजारात आधारभूत किमतीने खरेदीची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेकापच्या शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही या मागणीचे निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी आमदार संपतराव पवार-पाटील, मोहन पाटील, समर पाटील, प्रमोद पाटील, संजय डकरे, उमाजी कांबळे, केरबा पाटील, विश्वास अतिग्रे उपस्थित होते.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.