परवाना वाढ नाही
व्यवसाय परवान्यांचे
नूतनीकरणाचे आवाहन
कोल्हापूर : शहरातील छोटे व किरकोळ व्यावसायिकांचे व्यवसाय परवान्यासाठी कोणतीही दरवाढ नसल्याचे महापालिकेच्या परवाना विभागाने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत परवाना नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. परवाना विभागाकडील २०२५-२६ साठीच्या मंजूर दरसूचीत छोटे व किरकोळ व्यावसायिकांच्या परवान्यासाठी दरवाढ केलेली नाही. फक्त काही मोठ्या आस्थापनांतच वाढ केली आहे. कागदी बॉक्स, पिशव्या तयार करणे, मार्बल मंदिर विक्री, संगणकावर गाड्यांचे व्हिल अलायमेंट यासारखे छोटे संकिर्ण व्यवसाय आहेत. काही व्यवसायाच्या परवाना फीमध्ये २४ जून रोजी शासकीय दप्तरी ठरावाने दरवाढीत सुधारणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

