शिवसेना शहराच्या समस्या
73095
प्रश्नांची सोडवणूक करा,
अन्यथा महापालिकेला घेराओ
शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीतर्फे निवेदन
कोल्हापूर, ता. २५ ः शहरवासीय अनेक प्रश्नांनी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करावी, अन्यथा महापालिकेला घेराओ घातला जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आज दिला. उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाचे पाणी परिख पुलाखाली साचून वाहतूक बंद होते. स्टँड ते राजारामपुरी मार्गावरील पादचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था नाही. पादचारी पूल बांधण्यासाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे; मात्र दीड वर्ष झाले, काम सुरू झालेले नाही. नाले सफाई कागदावरच झाली आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. चौकांना नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यातील कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांनी संगनमताने ठेकेदारांच्या खिशात घातले आहेत. १५ हजारांपेक्षा जास्त पथदिवे बंद आहेत. अपघात आणि गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. पाण्याच्या टाक्यांची कामे अपूर्ण आहेत. शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यातही नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही. १०० कोटी निधीतून केलेले रस्ते उखडले आहेत. गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. घंटागाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साठले आहेत. प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना सुविधा द्याव्यात.
संभाजीनगर कामगार चाळीतील कुटुंबीयांचे योग्य पुनर्वसन करावे. कालच एका इमारतीची भिंत कोसळली. यावेळी विशाल देवकुळे, रीमा देशपांडे, दीपाली शिंदे, अनिता ठोंबरे, रूपाली जाधव, शिल्पा संकपाळ, महेश उत्तुरे, रघुनाथ टिपुगडे, सनराज शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

