रस्ता खोदला

रस्ता खोदला

Published on

73338
गळती दुरुस्तीसाठी नवीन रस्ता खोदला
रेसकोर्स नाक्याजवळ १०० कोटींच्या निधीतील रस्ता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः गळती ठेवून बुजवलेल्या रस्त्यातून पुन्हा गळती सुरू झाल्याने रेसकोर्स नाक्याजवळील १०० कोटी निधीतून केलेला नवीन रस्ता पाणीपुरवठा विभागाने आज खोदला. शंभर कोटींच्या निधीतून हा रस्ता केला होता.
इंदिरा सागर हॉटेलपासून दसरा चौकापर्यंतचा रस्ता केला आहे. त्यातील अजून गटारींची कामे झालेली नाहीत. या रस्त्याचे काम कळंबा फिल्टर हाउस ते पाण्याचा खजिना टाकीपर्यंत टाकायच्या जलवाहिनीच्या लांबलेल्या कामामुळे थांबले होते. जलवाहिनीची कामे पूर्ण करून रस्ता होणार असल्याचे सांगितले होते. रस्ता परत खराब होऊ नये म्हणून नागरिकांकडूनही संयम बाळगला होता. जलवाहिनीचे काम संपल्यानंतर रस्त्याचे काम केले. बऱ्याच वर्षांनंतर चांगल्या झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांत समाधान होते; पण त्यांचा आनंद पावसाळा व्यवस्थित सुरू होण्याआधीच मावळला. आज सकाळी रेसकोर्स नाक्याजवळ एका बाजूचा रस्ता खोदला. तेथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. पाईपलाईनसाठी इतका वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आता पुन्हा तिथे रस्ता का खोदला? असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात होता. जे काही काम झाल्यानंतर त्यावर डांबरीकरण काही पावसाळ्यात होईल असे वाटत नाही. त्यामुळे तिथे खड्डा राहणार आहे. बाजूचा रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे.
----
ठेकेदाराकडून फोडलेली वाहिनी
दुरुस्त न करताच बुजवली
याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून घेतल्यानंतर असे समजले, नवीन जलवाहिनी टाकत असताना त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कळंबा फिल्टर ते पाण्याचा खजिना दरम्यान असलेली वाहिनी फोडली. त्याची दुरुस्ती व्यवस्थित न करताच तो भाग बुजवला. त्यावेळी तलावातील पाणी कमी असल्याने त्या वाहिनीतून फारसे पाणी येत नव्हते; पण आता तलाव भरल्याने वाहिनीत पाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे गळती वाढली, त्यातील पाणी आजूबाजूच्या तळघरांमध्ये घुसले. याबाबत तक्रारी झाल्यानंतर आज ठेकेदाराकडून गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com