गड- मुत्नाळ प्रवचन

गड- मुत्नाळ प्रवचन
Published on

34507
मुत्नाळ ः येथील जगद्‍गुरू श्री दुरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठातर्फे सुरू असलेल्या प्रवचन कार्यक्रमात ‘जीवशिव ऐक्य’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी उपस्थित श्री गुरुसिद्ध शिवाचार्य महास्वामी, श्री महांत बसवलिंग स्वामीजी, दत्ता देशपांडे आदी.
.......................
सत्संगामुळे चंचल मन स्थिर

श्री गुरूसिद्ध महास्वामी ः मुत्नाळ मठातर्फे जीवन दर्शन प्रवचन

नूल, ता. ४ः ‘सुखी, समाधानासाठी माणूस भौतिक गोष्टीच्या मागे धावतो आहे. परंतु सुखाऐवजी त्याच्या वाट्याला दुःखच अधिक येते. त्यामुळे जीवन नैराश्यमय बनले आहे. घरात सगळ्या गोष्टी मिळतात, पण समाधान मिळत नाही. ज्ञानदासोह, प्रवचनसारख्या कार्यक्रमातून मनाला समाधान मिळते. सत्संगामुळे चंचल मन स्थिर होते,’ असे विचार हत्तरगीच्या कारीमठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी यांनी मांडले.
मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील जगद्‍गुरू श्री दुरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाच्या शाखेतर्फे आयोजित जीवन दर्शन प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. निरसोशी मठाचे डॉ. पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदासोह, अन्नदासोह सोहळा सुरू आहे. यानिमित्त बेलूर बदामी मठाचे श्री महांत बसवलिंग स्वामींच्या प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. ग्रंथ मित्र दत्ता देशपांडे प्रमुख उपस्थित होते.
श्री गुरुसिद्ध महास्वामी म्हणाले, ‘माणूस शाश्वत सुखासाठी अशाश्वत गोष्टींच्या मागे लागला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दुःखमय झाले आहे. चंचल मनाला ताब्यात ठेवण्यासाठी ज्ञानदासोह, प्रवचन, सत्संगसारखे कार्यक्रम महत्त्वाचे असतात. अशा कार्यक्रमातूनच मानवाला समाधान मिळू शकते.’
यावेळी बाळाप्पा कोळी लिखित ‘जीव शिव ऐक्य’ पुस्तकाचे स्वामींच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी बाळाप्पा कोळी, ग्रंथमित्र दत्ता देशपांडे यांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला मदतीचा हात देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा गौरव झाला. यावेळी राकेश मुरगी, भीमापा जरळी, सुरेंद्र बांदेकर, विठ्ठल चौगुले यांच्यासह भाविक उपस्थित होते. रावसाहेब मुरगी यांनी सूत्रसंचालन केले.
.....
चौकट...
अहंकारी वृत्तीचा त्याग करा
श्री बसवलिंग स्वामी म्हणाले, ‘माणसाच्या जीवनात संस्कार आणि संस्कृती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. युद्धाने नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येते, हा इतिहास आहे. त्यासाठी माणसाने अहंकारी वृत्तीचा त्याग करून एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करण्याची गरज आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com