गोकुळ मध्ये हनुमान जयंती

गोकुळ मध्ये हनुमान जयंती
Published on

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती
कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्यावतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त पाळणा, रुद्राभिषेक व भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी साडेसहाला हनुमान जन्मोत्सव सोहळा गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते झाला. यावेळी संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील यांच्यासह पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, नितीन तोडकर,सुभाष नाळे, सर्वेश जाधव, अर्जुन पाटील, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com