उजळाईवाडीत हनुमान जयंती उत्साहात

उजळाईवाडीत हनुमान जयंती उत्साहात
Published on

35192
परशुराम विद्यामंदिरात मार्गदर्शन
कोल्हापूर : पुढील आठवड्यात होणाऱ्या वार्षिक आणि ‘पॅट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, पद्मिनीयेशूवा फाउंडेशन आणि परशुराम विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे आणि त्यांना अभ्यासाची शिस्त लागावी, या उद्देशाने क्षितिजा उबाळे यांचे ‘शिस्त व आत्मविश्वास’ यावर व्याख्यान झाले. श्रावणी माने यांनी संयोजन केले. यावेळी मुख्याध्यापक आर. एम. गोसावी, गीता पाटील व निशा सुतार, शिक्षक आर. वाय. नाईक, के. एस. खर्डे, दिगंबर गिरीबुवा, सविता पडवळ, अश्विनी खोराटे, जनार्दन देशमुख, कुंडलिक जाधव, दीपक पाटील, स्वाती चौगुले, फरीदा बोबडे, प्रज्ञा पाटील, शंकर सूर्यवंशी, संतोष देसाई, प्रवीण गावकर, ऋतू सौंदले व शिवानी कांबळे उपस्थित होत्या.

हनुमान जयंतीनिमित्त
उजळाईवाडीत कार्यक्रम
कोल्हापूर : उजळाईवाडीतील हनुमाननगरमध्ये हनुमान ट्र्स्टतर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला. सकाळी धार्मिक विधीसह जन्मसोहळा, सायंकाळी महाप्रसाद वाटप झाले. यावेळी डॉ. शिशिर जिरगे, उद्योजक मनीष तोरस्कर यांना हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते गौरवले. जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ. शिल्पा हजारे, उपसरपंच सारिका माने, अर्पिता राजपूत, मिलिंद ठाकूर यांचाही विशेष सन्मान झाला. संरपच उत्तम आंबवडे, नायकू बागणे, सोनाली मजगे, प्रतिमा पोवार, काकासाहेब पाटील, अभय सिंह, विलासराव चव्हाण, हरिनारायण सिंह, संभाजी पाटील, अभिजित पाटील, रामआधार ठाकूर, गणपत दळवी, संजय जाधव, यल्लाप्पा व्हनकुप्पी, अरविंद विश्र्वकर्मा, संभाजी पावले, सुनीता सिंह, श्रद्धा सूर्यवंशी, किरण सुतार आदी उपस्थित होते.


अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
इचलकरंजीत प्रशिक्षण शिबिर
इचलकरंजी : महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घोरपडे नाट्यगृहात प्रशिक्षण शिबिर झाले. आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाज करताना येणाऱ्या अडचणीवर यावेळी चर्चा केली. त्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन केले. विविध कामांच्या फायली स्वयंस्पष्ट अभिप्रायासह कशा सादर कराव्यात, याबाबतच्या माहिती दिली. विजय राजापूरे यांनी प्रास्ताविक केले.

इचलकरंजीत गुरुवारी
नवकार सामुदायिक जप
इचलकरंजी : जीतो संस्थेच्या शहर शाखेतर्फे विश्वशांतीसाठी गुरुवारी (ता. ९) नवकार महामंत्राचा सामुदायिक जप होणार आहे. सकाळी सात ते आठ यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे उपक्रम होणार आहे. याबाबतची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमात शहरातून किमान चार हजार नागरिक सहभागी होतील. शहर तसेच परिसरातील धार्मिक ठिकाणी या मंत्राचा सामुदायिक जप केला जाणार आहे. सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कुरुंदवाड पालिकेची
९५ टक्के कर वसुली
कुरुंदवाड : गेल्या आर्थिक वर्षातील घरफाळा करवसुली ९५ टक्के तर पाणीपट्टी वसुली ७६ टक्के केली आहे. तिजोरीत मार्चअखेर घरफाळ्यापोटी १ कोटी ८५ लाख ५१ हजार तर पाणीपट्टीपोटी ५७ लाख जमा झाल्याची माहिती मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार १०० टक्के प्रतिसाद मिळाला. श्री. देसाई म्हणाले, ‘शहरातील ७८५१ मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडून १ कोटी ९४ लाख ९५ हजारांची मागणी होती. पाणीपट्टीसाठी ७४ लाखांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने वसुली मोहीम प्रभावीपणे राबवत १६ कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून वसुली केली. सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पालिकेला ९५ टक्क्यांहून अधिक करवसुली साध्य करता आली. या वसुलीने १५ वा वित्त आयोगाचा निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कर निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या. कर वसुली पथकात नंदकुमार चौधरी, निशिकांत ढाले, दिनेश हातळगे, अभिजित कांबळे, आनंदा शिंदे, शशिकांत कडाळे, संकेत कोथळे, रिजवान मतवाल आदींचा समावेश होता.

माजी विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्टर
महागाव : सरबंळवाडी (ता‌. आजरा) येथील कुमार वि. म. शाळेला माजी विद्यार्थी अनिल भोईटे यांनी प्रोजेक्टर भेट दिला. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी शाळे मार्फत शैक्षणिक उठाव सुरू केला आहे. या उठावाच्या अनुषंगाने माजी विद्यार्थी अनिल भोईटे यांनी प्रोजेक्टर भेट दिला. यावेळी मुख्याध्यापक राहुल बागडी, मंगळ पाटील, भारती चव्हाण व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देवरकर, शरद बुगडे, संदीप भोईटे आदी उपस्थित होते.

धुमाळवाडीत हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना
साळवण : मणदूर पैकी धुमाळवाडी (ता. गगनबावडा) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ झाला.
गुरुवारी सकाळी मूर्ती व कलश मिरवणुकीने कार्यक्रमास सुरूवात झाली. त्यानंतर होमहवन व वास्तुशांती कार्यक्रम झाला. विठ्ठल तात्यासो वास्कर महाराज यांच्या हस्ते कलशास अभिषेक करून स्वामी उंबरगिरी महाराज यांच्या हस्ते कलश स्थापना केली. गावातील सर्व माहेरवाशिनींना ओटी देण्याचा कार्यक्रम झाला. दुपारनंतर महाप्रसाद वाटप झाले. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तरुण मंडळाचे कार्यकर्ते, वारकरी सांप्रदायिक मंडळ व धुमाळवाडी, पाटीलवाडी व मणदूर गावच्या ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com