इचल : महापौर पत्रकार परिषद इचल : महापौर पत्रकार परिषद

इचल : महापौर पत्रकार परिषद इचल : महापौर पत्रकार परिषद
Published on

-
इचलकरंजीत मुख्य रस्ते
अतिक्रमणमुक्त करणार
महापौर धातुंडे : फेरीवाल्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करणार

इचलकरंजी, ता. ४ ः शहरातील वर्दळीचे मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्यात येणार आहेत. यात फेरीवाल्यांना मुदत दिली जाणार आहे. त्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली. स्वच्छतेबाबत लवकरच महापालिकेचे स्वतंत्र धोरण ठरविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महापौर धातुंडे म्हणाले, शहरातील सर्वच मुख्य रस्ते फेरीवाले, भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत, तर दुसरीकडे महापालिकेचे २५० हून अधिक दुकान गाळे रिकामे आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. पुढील काळात सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण दूर केली जातील. प्रत्यक्षात जाऊन आढावा घेणार आहोत. त्याबाबतची प्रक्रिया सोमवारपासून (ता.६) राबविण्यात येणार आहे. कारवाईपूर्वी फेरीवाला संघटनेबरोबर चर्चा केली जाईल. त्यानंतर २१ एप्रिलपासून थेट कारवाई केली जाईल.
स्वच्छतेबाबत ठोस नियोजन केले जाणार आहे. घंटागाडीव्दारे कचरा संकलित करण्याच्या कामाच्या ठेकेदार कंपनीचे काम समाधानकारक नाही. सतत सूचना दिल्यानंतरही त्यांच्या कामात बदल नाही. त्यांची मुदत चार महिन्यांत संपणार आहे. या कंपनीला बदलण्यात येणार आहे. डेपोवरील संकलित कच-यावर वेळीच प्रक्रिया होत नाही. संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे महापौर धातुंडे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, सभागृह नेता विठ्ठल चोपडे, स्थायी सभापती सतीश मुळीक, परिवहन सभापती अरुणा बचाटे, महिला व बालकल्याण सभापती रूपाली सातपुते, मागासवर्गीय कल्याण सभापती रुबेन आवळे, प्रभाग समिती सभापती अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, नगरसेवक रवी रजपुते, योगेश पाटील उपस्थित होते.

कोंडेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com