संगीत आणि आरोग्य व्याख्यान बातमी

संगीत आणि आरोग्य व्याख्यान बातमी
Published on

35595

संगीतामुळे मन आनंदी, शरीर
निरोगी राहते ः डॉ. संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ७ः ‘‘प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप बदलले, त्यातून जीवनशैली बदलली, ताण वाढले, त्यातून मानसिक स्वास्थ्यही बिघडले. यातूनच विविध रोगांना आमंत्रण दिले गेले. म्हणूनच निरोगी शरीरासाठी आनंदी मन आवश्यक आहे. संगीताने मन आनंदी राहते,’’ असे प्रतिपादन डॉ. संदीप पाटील यांनी केले. मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लबचा प्रोबस क्लब आणि प्रेस क्लबतर्फे ‘संगीत आणि आरोग्य’ विषयावर ते बोलत होते. नाना नानी पार्कमध्ये कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ‘केएमए’चे अध्यक्ष ए. बी. पाटील होते.
डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘शरीराचे बहुतांशी प्रश्न मानसिकतेशी संबंधित आहेत. आपण मनाची शांतताच हरवून बसलो आहे. त्यातून रक्तदाब, मधुमेह असे आजारही वाढले. आयुष्यात आनंद व अन्नाचा कण वाया घालवू नका. मोहामध्ये अडकला तर जगायचे राहून जाईल. किती जगला यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. आपण स्वतःला विसरलो आहे. आपल्याकडे जगावे कसे हे सांगावे लागत आहे. मन मोकळं करायला कोण नाही, अशी स्थिती झाली आहे. निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घ्या. मोबाईल, प्लास्टिकचा अतिवापर टाळा. संगीत म्हणजे आनंदी जीवनाचे टॉनिक आहे.’’ पोलिस उपधीक्षक (गृह) तानाजी सावंत प्रमुख उपस्थित होते. यावेळी दिगंबर कुलकर्णी, हंबीरराव संकपाळ, डॉ. प्रवीण नाईक, नलिनी पारीख, नंदा थोरात, श्रीकांत कोरवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com