शरद पॉलिटेक्निकमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

शरद पॉलिटेक्निकमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
Published on

35704
यड्राव ः येथे ‘शरद पॉलिटेक्निक’मध्ये आदर्श शिक्षकांचा सन्मान करताना गणेश शिंदे, अनिल बागणे, बी. एस. ताशीलदार आदी.

‘शरद पॉलिटेक्निक’मध्ये
शिक्षकांचा पुरस्काराने सन्मान
दानोळी, ता. ६ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले. व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते गौरव झाला. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. एस. एस. कोथळे (मेकॅट्रॉनिक्स), प्रा. ए. डी. पाटील (मेकॅट्रॉनिक्स), प्रा. एस. ए. शेख (कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) यांचा उत्कृष्ट शिक्षक, तर एस. एम. हनमाने, पी. पी. गावडे, एन. ए. बनिजवाडे यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान केला.
श्री. बागणे म्हणाले, ‘शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत त्यांना सक्षम, सुजाण आणि स्पर्धात्मक बनविण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात.’ प्राचार्य बी. एस. ताशिलदार, उपप्राचार्य प्रा. पी. एस. चौगुले, प्रा. दीपाली पाटील, प्रा. अंकिता धड्डे आदी उपस्थित होते. प्रा. अनुजा जुगळे व प्रा. धनश्री लोहार यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा सुतार हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com