

35708
इंचनाळ ः प्राचीन गणेश मंदिरासमोर मारलेल्या कूपनलिकेचे पाणीपूजन हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. यावेळी उपस्थित सतीश पाटील, प्रकाश पाटील, शैलजा पाटील, सुनीता देसाई आदी.
-------------------------
आयुष्यभर लोकोपयोगी कामे करू
मंत्री मुश्रीफ ः इंचनाळला विंधन विहिरीचे पाणीपूजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ ः ‘आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत जनतेला आवडणारी आणि जनतेची श्रद्धा असणारी कामे करीत आलो. संपूर्ण आयुष्यभर याच पद्धतीने लोकोपयोगी कामे करीत राहू,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले.
इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन श्री. गणेश मंदिराच्या प्रांगणात मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने मारलेल्या विंधन विहिरीचे पाणीपूजन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘येथील प्राचीन गणेश मंदिरात लाखो भाविक श्रद्धेपोटी येतात. जिल्हा परिषद निवडणुकीत विंधन विहीर मारून देण्याचे वचन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अध्यक्ष निवडीपूर्वीच विंधन विहीर मारून दिली आणि त्याला दीड इंची पाणीही लागले. आता पाणी साठ्यासाठी टाकी उभारून ते ग्रामस्थांना देण्यासाठी सतीश पाटील यांनी प्रयत्न करावेत.’ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, पंचायत समिती सदस्या सुनीता देसाई, विश्वनाथ स्वामी, सरपंच उत्तम कांबळे, सयाजी देसाई, शिवाजी राणे, आनंदराव पोवार आदी उपस्थित होते.
...........
चौकट...
पंढरपुरातही आश्रम बांधू
मुश्रीफ म्हणाले, ‘गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करणे हा अजेंडा घेऊन आपण वाटचाल करीत आहोत. येथील वारकरी संप्रदायाने पंढरपुरात आश्रमासाठी जागा घेतलेली आहे. तिथे सुंदर आश्रम बांधून देऊ. त्यामुळे आषाढी वारीसह वर्षभरात पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि ग्रामस्थांची चांगली सोय होईल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.