इचल : भाजप स्थापना दिन

इचल : भाजप स्थापना दिन
Published on

35733
इचलकरंजी ः भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त कार्यालयासमोर पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.

इचलकरंजीत भाजपचा
वर्धापन दिन साजरा
इचलकरंजी, ता. ६ ः भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते कार्यालयासमोर पक्ष झेंडावंदन करण्यात आले. भारतमाता प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन प्रमोद मिराशी, मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, बाळसाहेब माने यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख मिराशी यांनी मार्गदर्शन केले. पक्ष उभारणीची माहिती त्यांनी दिली. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांना कसा न्याय मिळेल, याचा विचार करण्यासह सेवा, संघर्ष व त्याग त्रिसूत्रीच्या माध्यमातून कार्यरत राहावे, असे आवाहनत त्यांनी केले. उपमहापौर अनिल डाळ्या यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली. यात महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रमुख चौकांत आकर्षक रांगोळी काढून सजावट केली होती. तर सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घरांवर पक्षाचा ध्वज फडकविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com