सांगली ः कोल्हापूरसाठी खून

सांगली ः कोल्हापूरसाठी खून
Published on

३५८१२, ३५८१३

सांगलीत तिघांचे निर्घृण खून
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ६ ः कवलापूर (ता. मिरज) येथे यात्रेत तमाशा झाल्यानंतर दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. विश्‍वास कल्लाप्पा सुतार (वय ३४, रा. कवलापूर, ता. मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगली ग्रामीण व एलसीबीच्या पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोर रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग ना ईक (२४, रा. कवलापूर, मूळ भोसे, ता. मिरज) यास जेरबंद केले. याप्रकरणी सूरज भूपाल सुतार (अवधूत कॉलनी, कवलापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पतीचा काढला काटा
कुपवाड : अनैतिक संबंधाचा संशय घेत असल्याचा कारणातून पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना कुपवाडमध्ये घडली. दगडू सुखदेव केंगार (वय ४० रा. विघ्नहर्ता कॉलनी कापसे प्लॉट, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी छबुताई दगडू केंगार (४०) व तिचा साथीदार शाहरुख फारुख मकानदार (३० कुपवाड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. फिर्याद अश्विनी रमेश गायकवाड (२९, कुपवाड) यांनी दिली. अखेर गुन्ह्याचा छडा लावत मृताची पत्नी तसेच तिच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना अटक केली.

दारू दुकानात गुन्हेगारावर सपासप वार
कुपवाड : कुपवाड - बामणोली रस्त्यावरील देशी दारूच्या दुकानात चेहऱ्यावर व डोक्यात धारधार शस्राने हल्ला करून गुन्हेगाराचा निर्घृण खून केल्याची घटना आज सायंकाळी घडली. सचिन महादेव माने (वय ३०, रा. बामणोली, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोध पथके रवाना केली. मृत सचिन सायंकाळी पाचच्या सुमारास बामणोली रस्त्यावरील एका सरकारमान्य देशी दारू दुकानात तो दारू पिण्यास आला होता. यावेळी माने याच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या काही संशयित हल्लेखोरांनी धारधार शस्रांसह दुकानात घुसून जोरदार हल्ला चढविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com