

एस.टी फोटो
--
जोतिबा यात्रेत एसटीला
३० लाखांचा गल्ला
७६ हजार ८३६ यात्रेकरूंचा प्रवास; एकूण १७८२ फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : जोतिबा चैत्र यात्रेत केवळ दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने तब्बल ३० लाख ९९ हजार ९११ रुपयांचे उत्पन्न मिळविले. यात्रेत एकूण ९५ एसटींतून ७६ हजार ८३६ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली असून, १७८२ फेऱ्या झाल्या आहेत.
कोल्हापूर विभागातील विविध आगारांकडून यात्रेसाठी विशेष बसफेऱ्या सोडल्या. ग्रामीण भागासह दुर्गम क्षेत्रांमधूनही मोठ्या प्रमाणात भाविकांनी एसटी सेवेला पसंती दिली. त्यामुळे प्रवासी भारमान समाधानकारक राहिल्याचे दिसून आले. संभाजीनगर आगारातून सोडलेल्या गाड्यांमधून सर्वाधिक १६ हजार ६१९ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यानंतर राधानगरी १० हजार ५६, गारगोटी ९ हजार ४२१, कुरुंदवाड ८ हजार २८३, इचलकरंजीतून ७ हजार ३०१ प्रवाशांनी गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद झाली आहे. विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी विभागाने जोतिबा यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा फेऱ्यांचे नियोजन केले होते.
--
ग्राफ करावा
-----------------
*आगारनिहाय एकूण उत्पन्न (लाखांत)
*आगार* एकूण उत्पन्न
*कोल्हापूर* १,८०,९२९
*संभाजीनगर* ५,४०,०७०
*इचलकरंजी* ३,३०,५०१
*गडहिंग्लज*२,४३,१२६
*गारगोटी*४,०४,०९२
*मलकापूर* ४१,६१०
*चंदगड*१,७४,४७८
*कुरुंदवाड*३,२३,९२९
*कागल*२,७८,२९७
*राधानगरी*३,५९,८४२
*गगनबावडा*३५,८००
*आजरा*१,८७,२३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.