आजरा ः नगरपंचायत हद्दीतील कचरा उचलण्याची मागणी

आजरा ः नगरपंचायत हद्दीतील कचरा उचलण्याची मागणी
Published on

36168
आजरा ः कचराप्रश्नी येथील नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना विरोधी गटाचे नगरसेवक.
-----------------------------------------------------------------
...अन्यथा सोमवारी कचरा
नगरपंचायतीच्या दारात टाकू

आजऱ्यात विरोधी नगरसेवकांचा इशारा ः मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः आजरा नगरपंचायत हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांमध्ये याबाबत मोठी नाराजी आहे. शहरातील कचरा उचलण्याची कार्यवाही तातडीने करावी. रविवार (ता. १२) पर्यंत दररोजचा कचरा उठाव झाला नाही, तर सोमवारी (ता. १३) नगरपंचायतीच्या दारात कचरा आणून टाकू, असा इशारा विरोधी गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्या उघडण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याचे समजते. संबंधित निविदा तातडीने उघडून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी. कारण निविदा उघडल्यानंतरही प्रत्यक्ष कचरा उठाव सुरू होण्यासाठी ठेकेदारास आवश्यक पूर्तता व कामाच्या पूर्वतयारीस काही कालावधी लागतो. त्याचबरोबर नगरपंचायतीची काही वाहने नादुरुस्त असल्याचेही निदर्शनास आले आहे. रविवारपर्यंत याबाबत कार्यवाही न झाल्यास सोमवारी नगरपंचायतीच्या दारात कचरा आणून टाकला जाईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, विरोधी नगरसेवकांनी नगरपंचायतीमध्ये तातडीची बैठक बोलावली. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी स्वच्छता अधिकारी अमर कांबळे यांच्यावर कचरा उठावाबाबत प्रश्नांची सरबती केली. शहरभर कचरा पसरला आहे, पण तुम्हाला निविदा काढण्यास उशीर का होतोय, आजरेकरांचा संयम सुटायची वाट पाहताय काय, अशी विचारणा केली. दोन दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. नगरसेवक असिफ पटेल, निसार लाडजी, अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, रेश्मा बुड्डेखान, कलाबाई कांबळे, डाॅ. स्मिता कुंभार, असिफ सोनेखान, विक्रम पटेकर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com