नारायण बाग कृषी, संशोधनासाठीच वापरा

नारायण बाग कृषी, संशोधनासाठीच वापरा
Published on

ajr82.JPG.......
आजरा ः एमआयडीसीसाठी नारायण बागेचे भूसंपादन नको, या मागणीचे निवेदन समीर माने यांना देताना संभाजी पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, युवराज पोवार व अन्य पदाधिकारी.
............................
नारायण बाग कृषी, संशोधनासाठीच वापरा

एमआयडीसी विस्ताराला ठाकरे शिवसेनेचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः औद्योगिक वसाहतीच्या विस्तारणीकरणासाठी संकेश्वर-बांदा महामार्गावरील नारायण बागेची जागा संपादन करण्याचा घाट घातला जात आहे. ही जागा काजू बोर्ड, बीजगुणन केंद्र व कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग राबविण्यासाठी केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले.
शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, ‘गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील काजूला भाैगोलिक मानांकन (जीआय) मिळविण्याचा प्रस्ताव आहे. त्याबाबत काजू उत्पादक संघ व प्रक्रिया उद्योगांशी चर्चाही झाली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी नारायण बागेचे संपादन करू नये. शासनाने यावर उपाय म्हणून २०११ मधे फळरोपवाटिका किंवा तालुका बीजगुणन केंद्राच्या जमीन खासगी संस्था, नगरपालिका आणि कोणत्याही संस्थेला हस्तातरीत न करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. त्यामुळे ही जागा एमआयडीसीला देऊ नये.’
तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, ‘अत्यंत दुर्मीळ असे वृक्ष असणारा वनाैषधी पार्क खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही. याविरोधात जनआंदोलन उभारू. सध्याच्या एमआयडीसीत वापराअभावी भूखंड शिल्लक आहेत. ठोस रोजगार देणारा एकही मोठा प्रकल्प या वसाहतीत नाही. असे असताना शहरालगतच एमआयडीसी तयार करणे पर्यावरणीयदृष्ट्या अयोग्य आहे. या जागेत पर्यटनाच्यादृष्टीने एखादा प्रकल्प अथवा काजू बी संशोधन केंद्र उभा रण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’
यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, समीर चाॅंद, संजय येसादे, महेश पाटील, सुनील डोंगरे, दिनेश कांबळे, अमित गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com