

शिंदे इंजिनिअरिंगच्या
तीन उपकरणांना पेटंट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या तीन नावीन्यपूर्ण उपकरणांना केंद्र सरकारकडून पेटेंट प्रमाणित केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी अमोल तांबेकर व वैष्णवी कुंभार यांनी बनविलेल्या रोबोटिक्स मेडिसीन स्प्रेअर व ॲटोमॅटिक एडजेस्टिंग प्रोजेक्टर या नावीन्यपूर्ण उपकरणाच्या उपयोगीता मूल्यावर व अभिनव कल्पकतेसाठी पेटंट प्रमाणित केले आहे. तसेच मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. गुरुराज कुंभार यांचे ॲग्रीकल्चरल स्प्रेअरिंग रोबोट या उपकरणास पेटंट प्रमाणित केले आहे. विद्यार्थ्यांच्या या नावीन्यपूर्ण व सृजनशील उपकरणास पेटंट कार्यालयाने प्रमाणित केल्याबद्दल प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव केला. संस्थेच्या सचिव प्रा. स्वाती कोरी यांनी विद्यार्थ्यांना एकूणच नवनवीन प्रकल्प व उपक्रमासाठी उपलब्ध केलेल्या संसाधनाची फलश्रुती होत असल्याचे स्पष्ट केले. संस्थाध्यक्षा ऊर्मिला शिंदे, सचिव स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी व कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांचे प्रोत्साहन लाभले.