

GAD98.JPG
36436
गवा खड्ड्यातील पाण्यात;
सुखरूप बाहेर काढण्यात यश
नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) डोंगरपायथ्याला व्हळी नावच्या शेतातील पाण्याच्या खड्डयात पडलेल्या गव्याला वन विभागच्या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. याबाबतची माहिती अशी, हडलगेत पप्पू पाटील यांनी शेतात पोल्ट्री बांधकामासाठी खड्डा काढून पाणी साठविले आहे. या खड्ड्यात गवा पडल्याचे आज दुपारी दोनच्या सुमारास विजय कुंभार यांच्या निदर्शनास आले. तरुणांनी गवा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही. त्यानंतर वन विभागाला याची माहिती दिली. गडहिंग्लजचे वनपाल सागर पोवार, मासेवाडी वनरक्षक प्रकाश शिंदे, दयानंद शिंदे, रूद्रगोंडा पाटील, वनसेवक तुकाराम जाधव व आजरा रेस्क्यू टीमचे साहील डेळेकर, अक्षय पाटील, समिर केरकर, किशोर नाईक, हरीबा कुंभार यांचे पथक दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने गवा बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. शर्थीच्या प्रयत्नानंतर सायंकाळी गव्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. गवा बाहेर येताच हडलगेच्या डोंगराळ भागात पळून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.