विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे

विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे
Published on

36465
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी प्रा. विशाल चांदणे, प्रा. स्वाती क्षीरसागर आदी उपस्थित होते.
---------------------------
विद्यार्थ्यांनी तयार केले
पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : पर्यावरण साखळीत पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सध्या उन्हाच्या प्रखर झळांमुळे पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. हीच गरज ओळखून येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागातर्फे पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठेनिर्मिती कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सहभागी ५० विद्यार्थ्यांनी कृत्रिम पाणवठे तयार केले.
पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. विशाल चांदणे यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ कॅन आणि प्लास्टिक बॉटलपासून पक्ष्यांसाठी पर्यावरणपूरक पाणवठे कसे तयार करायचे याबाबत मार्गदर्शन केले. पाणवठे तयार करण्यासाठी घरातील तेलाचे रिकामे कॅन किंवा प्लास्टिक बॉटल, तार, दोरी असे साहित्य वापरले. पक्ष्यांना बसता येईल व घराच्या गॅलरीत, माळरानावरील झाडावर लटकवता येतील अशा पद्धतीने हे पाणवठे तयार केले. कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांकडून कृत्रिम पाणवठे तयार करून घेतले. प्राचार्य उमेश सावंत, विभाग प्रमुख प्रा. स्वाती क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रा. पुंडलिक रक्ताडे, प्रा. दिनेश चिकुर्डे, प्रा. शिवाजी पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com