बाबाण्णावर वसाहत रस्त्याची दुर्दशा

बाबाण्णावर वसाहत रस्त्याची दुर्दशा
Published on

36584
जरळी ः बाबाण्णावर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था.
-----------------------------
बाबाण्णावर वसाहत रस्त्याची दुर्दशा

ग्रामस्थांतून तीव्र संताप ः खडीकरण, डांबरीकरण करणाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १० ः जरळी (ता. गडहिंग्लज) येथील नाईकवाडी कोपरा ते बाबाण्णावर वसाहतीपर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झाली असून वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथील ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
जरळी गावापैकी नाईकवाडीकडे आणि बाबाण्णावर वसाहतीकडे जाणाऱ्या पाऊण किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या वसाहतीत हजारभर लोकसंख्या आहे. नाईकवाडीकडे जाणाऱ्या एक कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण माजी आमदार राजेश पाटील यांच्या निधीतून डांबरीकरण झाले. मात्र, नाईकवाडी कोपऱ्यापासून बाबाण्णावर वसाहतीपर्यंत जाणाऱ्या पाऊण किलोमीटर लांबीचा रस्ता ‘जैसे थे’ आहे. स्व. बाबा कुपेकर आमदार असताना या रस्त्याचे एकदा खडीकरण झाले होते. त्यानंतर या रस्त्याला कोणीही वालीच नाही अशी स्थिती आहे. सध्या खडीकरण पूर्ण उखडले आहे. दुचाकी किंवा चारचाकी तर लांबच, रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्यात नेहमी या रस्त्यावर दलदलीचे साम्राज्य असते. येथील मुले दोन कि.मी. पायपीट करत गावातील शाळेला येतात. ग्रामस्थही बँक व इतर कामासाठी गावात येतात. एकदाही या रस्त्याचे डांबरीकरण नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. केवळ निवडणुकीपुरतीच राजकीय मंडळी येऊन शब्द देतात; पण निवडणुकीनंतर कोणीच फिरकत नाही. बांधकाम विभागाने रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. दोन महिन्यांत रस्त्याचे काम झाले नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com