

36599
कोल्हापूर ः छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यातील चुरशीचा क्षण. (अर्जुन टाकळकर ः सकाळ छायाचित्रसेवा)
..................
खंडोबा तालीम मंडळ उपांत्य फेरीत
सतेज चषक फुटबॉल स्पर्धा ः संयुक्त जुना बुधवार पेठवर एकतर्फी मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १०ः सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळने तुल्यबळ संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबवर पाच विरुद्ध शून्य अशी एकतर्फी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात विष्णू मणिकंदमचे दोन, तर प्रताप एफ., रोहित जाधव, पृथ्वीराज साळोखे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज या दोन संघांत उपांत्यपूर्व लढत रंगली. सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात वेगवान चाली रचल्या. त्यानंतर ‘खंडोबा’कडून वेगवान चढाया केल्या. त्यात विष्णू मणिकंदमने पहिला गोल नोंदविला. त्यानंतर प्रताप एफ.ने गोल करीत संघाची आघाडी पूर्वार्धात दोन विरुद्ध शून्य अशी भक्कम केली.
उत्तरार्धात खंडोबा संघ आघाडी वाढविण्याच्या, तर संयुक्त जुना बुधवार पेठचे खेळाडू आघाडी कमी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले. मात्र, काही मिनिटांतच रोहित जाधवने गोल करीत खंडोबा संघाची आघाडी तीन विरुद्ध शून्य अशी भक्कम केली. संयुक्त जुना बुधवारकडून मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, आदित्य माने, शुभम जाधव, संकेत कांबळे यांनी सामन्यात आघाडी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण ‘खंडोबा’ची भक्कम बचावफळी आणि सजग गोलरक्षक आयुष चौगलेच्या गोलरक्षणामुळे त्यांचा टिकाव लागला नाही. उलट ‘खंडोबा’कडून पृथ्वीराज साळोखेने गोल नोंदवत संघाची आघाडी चार विरुद्ध शून्य अशी आणखी भक्कम केली. या गोलनंतर संयुक्त जुना बुधवारकडून मयूर सुतारने संधी मिळेल त्याप्रमाणे ‘खंडोबा’च्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे प्रयत्न असफल ठरले. या प्रयत्नानंतर ‘खंडोबा’कडून विष्णू मणिकंदमने संघाचा पाचवा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. अखेरीस याच गोलसंख्येवर सामना जिंकत खंडोबा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
..................
खंडोबा संघाकडून गोल असे
प्रथमेश गावडेने २६ व्या मिनिटाला दिलेल्या पासवर विष्णू मणिकंदमने पहिल्या गोलची नोंद केली. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला कुणाल दळवीने दिलेल्या पासवर प्रताप एफ.ने दुसरा गोल नोंदविला. उत्तरार्धात ४४ व्या मिनिटाला मणिकंदमने रोहित जाधवने दिलेल्या पासवर तिसरा गोल नोंदविला. सचिन एस.ने दिलेल्या पासवर पृथ्वीराज साळोखेने संयुक्त जुना बुधवारचा गोलरक्षक मोठ्या गोलक्षेत्राबाहेर आल्याचा फायदा उठवत ५५ व्या मिनिटाला चौथा गोल नोंदविला. मणिकंदमने ६३ व्या मिनिटास मैदानी गोल करीत पाचवा गोल नोंदविला.
..................
सामनावीर ः विष्णू मणिकंदम (खंडोबा तालीम)
..................
आजचा सामना
दु. ४. ०० वा. ः दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.