

लोगो
स्किन ट्रॅप - भाग तीन
--
ब्युटी पार्लरमध्ये राजरोस उपचार
जिल्ह्यात बनावट ‘प्रॅिक्टस’; आरोग्य विभागाकडून तपासणी आवश्यक
लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राजरोस बनावट ‘प्रॅिक्टस’ कशी सुरू आहे, हे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. चक्क ब्युटी पार्लरमध्ये उपचार केल्यामुळे कानाची पाळीच तुटली आहे. ती परत जोडता येत नाही. कार्पोरेट ऑफिससारखे ‘िट्रटमेंट सेंटर’ उभे केले आहे. कोणी विचारणा केलीच तर मी कोण आहे, माहिती आहे का? हेच सुनावले जात असल्याचा काहींचा अनुभव आहे.
एका महिलेला कानाच्या पाळीला कर्णफुलामुळे जखम झाली. त्या पार्लरमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांच्यावर उपचार केले. ज्यामुळे त्यांच्या कानाची पाळीच तुटली. नंतर हीच महिला अधिकृत त्वचारोग तज्ज्ञांकडे गेली; मात्र येथे काहीच उपचार होणार नसल्याचे सांगण्यात आले. एका बनावट डॉक्टरने जीभेत इंजेक्शन दिले. त्यानंतर संसर्ग बरा करण्यासाठी अधिकृत डॉक्टर शोधावे लागल्याचेही सांगितले. चेहऱ्यावरील उपचारातही अनेकांना असे अनुभव आले; मात्र याबाबतची तक्रार पोलिसांकडे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली जात नाही. काही डॉक्टरांनी अधिकृत त्वचारोग तज्ज्ञांची नावे प्रिस्क्रिप्शनवर दिली आहेत. त्या ठिकाणी ‘व्हिजिटिंग कन्सलटंट’ असे म्हणून पळवाट शोधण्याचाही प्रयत्न केला आहे.
--
सत्यता पडताळणीची गरज
शहरासह जिल्ह्यात खऱ्या अर्थाने किती त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त उपचार करणारे किती डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठीची पदवी आहे का? याबाबत आरोग्य विभागाने तपासणी मोहीम सुरू केल्यास अनेकांचे पितळ उघडणे होणार आहे; पण ही मोहीम सुरू करण्याची धमक दाखविली पाहिजे.
---------------
असोसिएशनतर्फे ज्यांच्याकडे अधिकृत पदवी आहे, त्यांच्याकडेच उपचार घ्या, असे आवाहन करीत आहोत. देशपातळीवर याबाबत जनजागृती आणि आवश्यक तेथे गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापुरात सुद्धा अशा पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
- डॉ. योगानंद फुलारी, अध्यक्ष, डर्मेटोलॉजिस्ट असोसिएशन
उत्तेजक द्रव्यांमुळे रुग्णाचे नुकसान---------------
टक्कल कमी करणे, चेहऱ्यावरील डाग, फोड, कमी करणे, कायमचे नष्ट करणे यासाठी छोट्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी स्टेरॉईड (उत्तेजक द्रव्यांमुळे रुग्णाचे नुकसान) वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम होतात. यातून रुग्णांची हानी होऊ शकते. यासाठी वापरली जाणारी उपकरणे अधिकृत त्वचारोग तज्ज्ञांव्यतिरिक्त अन्य कोठे आहे. तेथे त्याचा वापर कोण करते, याचीही चौकशी झाली पाहिजे. दातासोबतच त्वचा रोगांवर उपचार केले जातात काय, याचीही चौकशी झाली पाहिजे.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.