दिलबहार ताली मंडळ उपांत्य फेरीत

दिलबहार ताली मंडळ उपांत्य फेरीत
Published on

36768
कोल्हापूर ः छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात दिलबहारच्या खेळाडूची चढाई फुलेवाडीच्या गोलरक्षकाने रोखली. (अर्जुन टाकळकर ः सकाळ छायाचित्रसेवा)
.................
दिलबहार तालीम मंडळ उपांत्य फेरीत

सतेज चषक फुटबॉल स्पर्धा ः ‘फुलेवाडी’वर तीन विरुद्ध दोन गोल फरकाने मात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः स्वयंम साळोखेच्या दोन, तर प्रथम भोसलेच्या एक गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळला तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकाने पराभूत करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत या दोन संघांत आज उपांत्यपूर्व लढत रंगली. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी वेगवान चाली रचत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात दिलबहारच्या थांगलेनने दिलेल्या पासवर स्वयंम साळोखेने ११ व्या मिनिटाला गोल करीत संघाला पहिली आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘फुलेवाडी’कडून मारुती कोळी, अक्षय पाटील, सिद्धार्थ पाटील, अक्षय मंडलिक, आयुष पाटील यांनी चढायांची धार वाढवत बरोबरी साधण्याचे अथक प्रयत्न केले. उलट २६ व्या मिनिटाला ‘दिलबहार’कडून आघाडीचा खेळाडू लामजेखोनने दिलेल्या पासवर प्रथम भोसलेने गोल नोंदवत संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य अशी भक्कम केली. या गोलनंतर ‘दिलबहार’कडून वेगवान चाली रचण्यात आल्या. त्याला ३८ व्या मिनिटास पुन्हा यश आले. त्यांच्या स्वयंम साळोखेने ‘फुलेवाडी’च्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत मारलेला फटका गोलरक्षकाने अडविला आणि तो चेंडू स्वयंमच्या पाठीला लागून गोलजाळ्यात गेला. त्यामुळे संघाला तीन विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळाली. पूर्वार्ध संपण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना ३९ व्या मिनिटाला ‘फुलेवाडी’कडून सत्यम पाटीलने उत्कृष्ट मैदानी गोलची नोंद करीत आघाडी तीन विरुद्ध एक अशी कमी केली.
उत्तरार्धात दिलबहार संघ आघाडी वाढविण्याच्या उद्देशाने, तर फुलेवाडी संघ आघाडी कमी करून बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. ‘दिलबहार’कडून फेबीन, माणिक पाटील, संकेत वेसणेकर यांनी उत्कृष्ट चाली रचल्या. मात्र, फुलेवाडी संघाने खेळात बदल करीत वेगवान चढाया करण्यास सुरुवात केली. त्याला अखेरच्या जादा वेळेत दिलबहार संघाच्या गोलक्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत सत्यम पाटीलने संघासह वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत आघाडी तीन विरुद्ध दोन अशी कमी केली. या गोलनंतर फुलेवाडी संघाने चेंडू ‘दिलबहार’च्या गोलक्षेत्रात ठेवून आघाडी कमी करून बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. अखेरीस ‘दिलबहार’ने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
................
सामनावीर ः स्वयंम साळोखे (दिलबहार)
...........
आज पहिली उपांत्य लढत
दु. ४.०० वा. ः पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com