कलिंगडाच्या मागणीत घट; शेतकरी आर्थिक संकटात

कलिंगडाच्या मागणीत घट; शेतकरी आर्थिक संकटात
Published on

5936, 5938
सुळेरान ः येथील शेतकऱ्याने घेतलेले कलिंगडाचे पीक. दुसऱ्या छायाचित्रात बाजाजारात पाठवण्यासाठी तयार ठेवलेली कलिंगडे.
-----------------------------
कलिंगडाच्या मागणीत घट; शेतकरी आर्थिक संकटात

वातावरणातील बदलासह युद्धाचा फटका; दरात घसरण, उत्पादन खर्चही निघेना

रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः दरवर्षी उन्हाळ्यात कलिंगडांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. तालुक्यात यंदा कलिंगड उत्पादन व मागणीत घट झाली असून, दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बदलते वातावरण, रोग-किडीचा प्रादुर्भाव आणि इराण-अमेरिका युद्धामुळे निर्यात घटल्याने स्थानिक बाजारपेठेतही मागणी कमी झाली आहे.
कलिंगड पीक साठ दिवसांचे आहे. उन्हाळ्यात या पिकाला चांगली मागणी असते. गतवर्षी या पिकाचे उत्पादन व मागणी चांगली होती. बाजारपेठत दरही चांगला मिळाला होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे पिकावर विविध रोग व किडीचे आक्रमण झाले. बहुतांशपणे फळावरील विषाणू रोग अधिक प्रमाणात आढळून येत आहे. शेतकऱ्यांनी यावर औषध फवारणी केली, पण दर्जेदार पीक आले नाही. या पिकाचा कालावधी साठ दिवसांचा असतो. यंदा तो सत्तर दिवयांवर गेल्याने शेतकऱ्यांचा खर्चातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर या पिकाला आखाती देशांत मोठी मागणी राहते. यंदा इराण-अमेरिका युद्धामुळे निर्यातही घटली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत असल्याने फळाला मागणी नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यंदा उत्पादन खर्च तरी निघेल की नाही, या चिंतेत शेतकरी आहेत. गडहिंग्लज उपविभागातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला दर मिळत नसल्याने स्वतः विक्री करणे सुरू केले आहे. मात्र, मागणीअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे.
......................
चाैकट....
कलिंगड तुलनात्मक दर (प्रतिटन)
एप्रिल २०२५ ः १४ ते १७ हजार रुपये
एप्रिल २०२६ ः ४ ते ६ हजार रुपये
.......
कोट...
गतवर्षी कलिंगड पिकाला चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी या पिकाकडे वळले. इराण-अमेरिका युद्धापूर्वी कलिंगडाचा दर प्रतिटन २२ ते २७ हजार रुपये होता; परंतु तोच दर गेला महिनाभर चार ते सात हजार रुपये इतका खाली आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.
- मंगेश पोतनीस, सातेवाडी-आजरा, कलिंगड उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com