इचल : संक्षिप्त

इचल : संक्षिप्त
Published on

पाटील मेडिकल काॅलेजचे हिवाळी स्पर्धेत यश
इचलकरंजी ः कोरोची (ता. हातकणंगले) येथील डॉ. शुभांगी प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधील बीएएमएस (द्वितीय वर्ष) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. महाविद्यालयाचा निकाल ८५.४१ टक्के इतका लागला. यामध्ये स्वाती गीते (१४९९ गुण), अलिषा शेख (१४०२), योगिता माळी (१३९२) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. संस्थापक डॉ. प्रदीप पाटील व अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. प्रमोदिनी पाटील, डॉ. प्रशांत मळगे, डॉ. अमोल पाटील, डॉ. राहुल पवार, डॉ. पूजा देशमुख, डॉ. सिमरन मुल्ला, डॉ. गजानन कुलकर्णी, डॉ. रंजीत पाटील, डॉ. यास्मिन पिरजादे, डॉ. निखिल पाटील, डॉ. आनंद कांबळे, डॉ. स्नेहा माळी यांच्यासह व्यवस्थापक किशोर निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com