महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा

महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा
Published on

महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा
कोल्हापूर, ता. १३ : पावसाळ्याच्या पाश्‍ र्वभूमीवर विद्युत पुरवठ्यामधील व्यत्यय टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीचा आढावा महावितरणच्या मुंबई मुख्य कार्यालयातील अभियंता अरविंद पवार यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सहा उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील सहा उपविभागीय कार्यालयांना पवार यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून काय तयारी सुरू आहे? वीज अपघातांचे प्रमाण स्पेसर बसविल्यानंतर किती आहे ? महावितरणच्या यंत्रणांचे देखभाल दुरुस्तीचे काम कसे सुरू आहे? अशी विचारणा पवार यांनी संबंधितांना केली. तसेच वीज अपघात टाळण्यासाठी वेळेवर यंत्रणांची देखभाल दुरुस्ती करा, यंत्रसामग्रीसाठी निधी पाहिजे असल्यास त्याची मागणी करावी; अशा सूचना त्यांनी दिल्या. वीज ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा, असे आवाहन ही त्यांनी केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com