

फोटो क्रमांक : gad146.jpg
37365
खंडोबा चषकावर ‘अन्नपूर्णेश्वर’चे नाव
गडहिंग्लजला फुटबॉल स्पर्धा : रेडेकर फाउंडेशनला उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील अनुग्रह टर्फवर सेव्हन साईड साखळी फुटबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत अन्नपूर्णेश्वर एफसी संघांने विजेतेपद पटकावत खंडोबा चषकावर आपले नाव कोरले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी केदारी रेडेकर फाउंडेशनचा १-० असा पराभव केला. रेडेकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रकाशझोतात दोन दिवस स्पर्धा चालली.
अंतिम सामना अटीतटीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या. मात्र, गोलची कोंडी फुटली नाही. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ‘अन्नपर्णेश्वर’चा कर्णधार विनायक काळगे याने निर्णायक गोल केला. बरोबरीसाठी रेडेकरच्या खेळाडूंनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. याच गोलफरकावर ‘अन्नपूर्णेश्वर’ने विजेतेपद निश्चित केले. प्रशांत सलवादे, प्रदीप देवार्डे, निखिल खन्ना यांनी पंच म्हणून काम पाहिले.
शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, सुनील साठे, हणमंत साठे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. श्री. रेडेकर यांचा विशेष सत्कार झाला. दीपक पाटील, रवी खोत, रामदास खरवे, अदित्य मोहिते, राजाराम वाघ उपस्थित होते. अभिषेक चव्हाण, किरण कावणेकर, रोहित सुतार, विनायक काळगे, विनायक चोथे यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.