

ऑक्सिजन पार्कमध्ये
वनभोजन कार्यक्रम
इचलकरंजी : एव्हरग्रीन मॉर्निंग क्लब, यड्राव-शहापूरच्या सदस्यांनी जांभळी (ता. शिरोळ) येथील आम्ही जांभळीकर फाउंडेशनच्या ऑक्सिजन पार्क, अमृतवन येथे सहकुटुंब भेट दिली. वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करून निसर्गाशी जवळीक साधली. सदस्यांनी संपूर्ण पार्कचा फेरफटका मारत विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. फाउंडेशनचे सदस्य गोविंद जाधव यांनी पार्कची संकल्पना, पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती दिली. यावेळी सर्वांनी घरून आणलेल्या शिदोरीचा एकत्रित आस्वाद घेत आनंददायी वातावरणात वनभोजनाचा आनंद लुटला. अक्षय खोंद्रे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.